शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आता तापणार राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:29 IST

किशोर नारे वाशिम : जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपाने आधीच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले ...

किशोर नारे

वाशिम : जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपाने आधीच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यात खासदारांच्या शिक्षण संस्थांची ईडीकडून चाैकशी झाल्याने आता आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असे वातावरण शिवसेनेत दिसून येत असल्याने, राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ईडीची चाैकशी सुरू झाल्याने भाजप कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत.

भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याची चाैकशी करण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलेच वादंग झाले हाेते. किरीट साेमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दिवशी खासदार भावना गवळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबीयांनी ५०० काेटी रुपयांचा जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आराेप केला हाेता. या आराेप-प्रत्याराेपामुळे दरराेज राजकीय घडामाेडी सुरू झाल्यात. त्या आजतागायत सुरू असून, अचानक ३० ऑगस्ट राेजी खा.भावना गवळी यांच्या ५ संस्थांची चाैकशी ईडीकडून करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रकरणांची पाेलखाेल केल्या जाणार असल्याची चर्चा हाेत आहे. यामुळे निवडणुका नसल्या, तरी वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसून येत आहे. यापुढे ते अधिक तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप व शिवसेना लाेकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र जिल्ह्यात असून, इतर राजकीय पक्ष आपल्या कार्यात मग्न दिसून येत आहेत.

....................

साेशल मीडिया शांत

खासदार व आमदार यांनी भ्रष्टाचार केल्याच्या आराेपांच्या फैरी दहा दिवसांपूर्वी सुरू झाल्या हाेत्या, तेव्हा साेशल मीडियावर चांगल्याच गाजत हाेत्या, परंतु ईडीने चाैकशी केल्यानंतर साेशल मीडियावर शांतता दिसून आली. दाेन्ही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काेणत्याच प्रकारची पाेस्ट पेस्ट केल्याचे दिसून आले नाही. या कारवाईने ‘कही खुशी कही गम’चे वातावरण दिसून आले असले, तरी इतर व्हाॅट्सॲप ग्रुप, फेसबुकवरही काेणी काॅमेन्टस केल्याचे दिसून आले नाही.

..........

आराेप-प्रत्याराेप चाैकशीत विकास पडला मागे

गत ११ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय आराेप-प्रत्याराेप व आता ईडीकडून चाैकशीने राजकीय वातावरण तापल्याने विकास कार्य मागे पडले आहे. या आराेप-प्रत्याराेपात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतल्याने विकास कामाऐवजी, नागरिकांच्या समस्या बाजूला सारल्या गेल्या आहेत. एकमेकांचे उणेदाणे काढण्यातच वेळ जात असल्याचे चित्र वाशिम येथील राजकारणात सद्यस्थितीत दिसून येत आहे.