शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

तांडा वस्ती सुधार योजनेत बंजारा समाजाला अशासकीय पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

तांडा, वस्ती आणि वाडी यांच्या विकासाकरिता वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना समिती आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्याच्या ...

तांडा, वस्ती आणि वाडी यांच्या विकासाकरिता वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना समिती आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्याच्या या समितीवर वि.जा.भ.ज.या प्रवर्गातून अशासकीय अध्यक्ष, सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत होती, परंतु तत्कालीन भाजप सरकारने ३० जानेवारी, २०१८चे शासन निर्णयनुसार त्यामध्ये बदल करून जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष राहील, असा निर्णय काढण्यात आला. या निर्णयामुळे तांडा, वस्तीत पाहिजे, त्या प्रमाणात सुधारणा होऊ शकली नाही. या संदर्भात सविस्तर निवेदन महंत सुनील महाराज पोहरादेवी यांच्या नेतृत्वात बंजारा समाजाचे शिष्टमंडळाने मंत्री विजय वडेट्टीवार (वि.जा.भ.ज.व ई. मा.व. मंत्री) यांची मुंबई येथे भेट घेऊन देण्यात आले हाेते. या शिष्टमंडळात प्रामुख्याने महंत सुनील महाराज, राजेश चव्हाण जालनेकर, ॲड.विशाल राठोड, प्रा.वसंत राठोड पुसद, नरेश राठोड मुंबई, मोहन जाधव यवतमाळ, शिवणी, अविनाश चव्हाण मांडवी, सुमित राठोड माहूर, रमेश जाधव बुलडाणा, श्रीकांत राठोड शेगी, जितेंद्र चव्हाण, नागपूर हे उपस्थित होते. अतिशय तत्परतेने ना.वडेट्टीवार यांनी निर्णय घेतल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.