शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी-शिवसेनेच्या उमेदवारीवर जनतेच्या नजरा

By admin | Updated: August 23, 2014 23:23 IST

१९७८ च्या पुर्वी झालेल्या मतदार संघ पुर्नरचनेत कारंजा विधानसभा मतदार संघ अस्तिवात आला.

कारंजा: सन १९७८ च्या पुर्वी झालेल्या मतदार संघ पुर्नरचनेत कारंजा विधानसभा मतदार संघ अस्तिवात आला. या मतदार संघात ७ वेळा आमदार निवडुण आले. यानंतर सन २00९ मध्ये कारंजा मानोरा नविन मतदार संघ निर्माण होउन मानोरा कारंज्याला जोडल्या गेला. व मंगरुळपीर वाशिमला जोडला. यामूळे मतदार संघातील उमेदवाराची गोची झाली. त्यामुळे प्रत्येक पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी कारंजा मतदार संघात उमेदवारांची चुरस निर्माण होउन राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यामध्ये तू तू मै मै असा विषय पक्षक्षेष्ठीकडे सुरु आहे. तर शिवसेना पक्षाची उमेदवारी माण्यासाठी १५ उमेदवार ईच्छूक आहेत. यामूळे या मतदार संघातील मतदारांच्या नजरा राष्टवादी व शिवसेनेच्या उमेदवारीवर लागल्या आहेत. मतदार संघाचा एकदा उमेदवार निश्‍चित झाला की,मतदार संघाचे खरे चित्र पहायला मिळेल. सन १९९0 ते २00९ पर्यंत पाच आमदार विजयी झाले. यामध्ये शिवसेनेचे २ आमदार, भारतीय कॉग्रेसचा १ अपक्ष १ राष्टवादीचा १ याम्रमाणे पक्षीय बलाबल राहीले आहे. या पंचविस वर्षात मतदारांनी बाहेरील उमेदवाराचा स्विकार करुन विजय केले. यामध्ये राष्टवादीचे विद्यमान आमदार तीन वेळा परभुत झाले. सन २00९ च्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दुप्पटीने मते घेउ विजय मिळविला. सन २00४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार याच्या विरोधात विद्यमान आमदार यांनी भारीप बहुजन महासंघ या पक्षावर निवडणुक लढविली. त्यावेळी विद्यमान आमदार ४७ मतानी पराभूत झाले. यावेळी बाहेरील उमेदवारावर असलेली मतदाराची नाराजी व नविन चेहर्‍यांना संधी व स्थानिक उमेदवार प्राध्यान देत २00९ च्या नविन कारंजा मानोरा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विजयी झाले. या निवडणुकीत सुध्दा मंगरुळपीर मतदार संघ वाशिम येथे जोडल्या गेल्याने तेथील राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याची गोची होउन त्यांनी बंड पुकारत निवडणुक लढविली मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. यावेळी मिळालेले मताधिक्य विद्यमान आमदार यांना ६३ हजार ४१ मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे माजी आमदार यांना ३२ हजार ३३७ तर राष्टवादीतून बंडोखोरी करणारे अपक्ष उमेदवार यांना ३0 हजार ७९६ मते मिळाली. भारीपचे अकोला येथील जि.प.सदस्य हेही उमेदवार चर्चेत होते. कारंजा विधानसभा मतदार संघात मानोरा तालुका जोडला आहे. त्यामुळे या मतदार संघाची व्याप्ती वाढली. या मतदार संघात एकुण १६ जि.प. व ३२ पंचायत समिती सर्कल असून एकुण ३0३ गावे आहेत. या मतदार संघाची एकुण लोकसंख्या ३ लाख ७0 हजार ४१३ आहेत. यामधून २ लाख ९७ हजार ८६५ मतदार आहेत. मतदार संघाचे चित्र फार वेगळे आहेत. ज्या समाजाचे उमेदवार निवडणुक लढविण्यास ईच्छूक आहेत. त्या समाजाचे गठ्ठा मतदान असल्याने त्यांना निवडणुक लढविणे कठीन जात नाही. राष्टवादी पक्ष, भारतीय कॉग्रेस, शिवसेना भाजप, भारीप या पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी दिग्गज पक्षक्षेष्ठीकडे चकरा मारत असून काही उमेदवार्‍याच्या समाजाच्या बैठका, मतदारांच्या भेटी घेणे, पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष राहणे योग्य की अयोग्य असा प्रश्न मतदारांना उमेदवार विचारत आहे. मात्र काही पक्षाकडे उमेदवार निवडणूक येण्याईतके सक्षम उमेदवार नसल्यामुळे तोडीचा उमेदवार शोधण्यासाठी शोधाशोध सुरु आहे. तर राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय दिग्गज तयारीत आहे. राष्टवादी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष यांना माहीत होते की, येणार्‍या निवडणुकीत या मतदार संघाचे उमेदवारी वाटपाचे गणीत कसे बसवायचे यामुळे राष्टीय अध्यक्षानी विद्यमान आमदार यांना लाल दिवा देउन विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे दुसर्‍या उमेदवाराला संधी मिळते काय असा अंदाज राजकीय जानकारांनी व्यक्त केला असून नागरिकही याबाबत चर्चाकरीत आहेत.राष्ट्रवादीची उमेदवारी स्थानिक विद्यमान आमदार किंवा बाहेरील उमेदवार यांना मिळते काय या बाबत वावळ्या उमटत आहे. मात्र या उमेदवारीसाठी स्थानिक व मंगरुळपीर येथील इच्छुकांत चुरस वाढली आहे. मात्र विद्यमान आमदार तिन वेळा पराभूत झाले असली त्यांचे मताधिक्य व संपर्क कमी झाला नाही. यांच्या विरोधात उमेदवारी लढविणे सोपे नाही मात्र लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत फेरबद्ल व आघाडीमध्ये असलेली नाराजी यांचाही परीणाम होउ शकतो. तसेच त्यांच्या स्पष्ट व फटकळ बोलण्यावरून अनेक जण दुखावत असल्याने त्यंना उमेदवारी मिळते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पक्षाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला द्यायची याकरीता प्रत्येक पक्षाचे नेते उमेदवारांची चाचपाणी करीत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा सेना पक्ष उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचा ठप्पका ठेवत पक्ष क्षेष्ठीकडे शिवसेनेच्या एका माजी आमदाराला भाजपा सेनेची उमेदवारी मिळणे कठीण असल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे. त्याबरोबर भाजप सुध्दा या मतदार संघावर आपला दावा करीत असून याकरीता सुध्दा भाजपाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष भाजपाकरीता सुटावा या मागणीसाठी जिवाचे रान करीत आहेत ,त्यामुळे भाजपा सेनेची उमेदवारी कोणाला हाही प्रश्न गंभीर आहे.राष्ट्रवादीच्या पक्षक्षेष्ठीसमोर कारंजा व मानोरा मतदार संघाची उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न त्यांच्या समोर गंभीर झाला आहे. त्यामुळे राष्टवादी, शिवसेनेच्या उमेदवारीवर मतदार संघाच्या नजरा लागल्या आहेत.