शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

राष्ट्रवादी कॉग्रेसने बांधले आघाडीच्या हातावर ‘घड्याळ’

By admin | Updated: July 13, 2014 22:31 IST

नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसची युती अभेद्य राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वाशिम : आगामी १४ जुलै रोजी होवू घालतलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसची युती अभेद्य राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन नामांकन दाखल केलेल्या विद्यमान उपाध्यक्षा सायराबी सलीम बेनिवाले यांनी १३ जुलैला नामांकन मागे घेतल्यामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. बेनिवाले यांनी माघार घैतल्यामुळे शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे व जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमाले यांच्यात लढत होत आहे. स्थानिक नगराध्यक्षपदासाठी १४ जुलैला निवडणूक होवू घातली आहे. विद्यमान नगराध्यक्षा रेखाताई शर्मा यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होत आहे. यावेळी नगराध्यक्षपद ओबिसी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. या निवडणूकीत जिल्हा विकास आघाडीच्या लताताई उलेमाले, शिवसेनेच्या कृष्णाताई गोरे व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सायराबी बेनिवाले यांनी नामांकन दाखल केले होते. २७ सदस्य संख्या असलेल्या नगर पालिकेत जिल्हा विकास आघाडीचे १२, शिवसेनेचे ९, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाच तर कॉग्रेसचे एक नगरसेवक आहेत. गत वेळी जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसने एकत्र येऊन सत्तास्थापण केली होती. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षपद आघाडीकडे असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या वाट्यावर सदर पद यावे असा आग्रह स्थानिक पदाधिकार्‍यांनी धरला होता. त्याच पृष्ठभूमिवर सायराबी बेनिवाले यांनी नामांकनही दाखल केले होते. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षैप करून पालिकेतील सत्तारूढ युती अभेद्य ठेवण्यात यश मिळविले आहे. नामांकन परत घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सायराबी बेनिवाले यांनी आपले नामांकन परत घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोरे व जिल्हा विकास आघाडीच्या उलेमाले यांच्यात ही लढत होणार आहे.शिवसेनेनेही यावेळी या निवडणूकीत रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.

** उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्याला

जिल्हा विकास आघाडी व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युतीत नगराध्यक्षपद जिल्हा विकास आघाडीकडे गेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर जाणार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये या पदासाठी बरेच इच्छूक आहेत. विद्यमान उपाध्यक्षा सायराबी बेनिवाले यांचे पती सलीम बेनिवाले, पालिकेतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेता मो. जावेद पहेलवान, शोभाताई अंभोरे, विद्यादेवी लाहोटी आदींची नावे या पदासाठी चर्चेत असली तरी पक्ष काय निर्णय घेतो त्यावरच सर्व अवलंबून राहणार आहे.