शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

नांदु-याच्या महिलेची होणार ‘एचएलए टायपिंग टेस्ट’

By admin | Updated: December 9, 2015 15:47 IST

किडनी तस्करी प्रकरण; शांताबाई खरातच्या किडनीचा लागणार शोध.

सचिन राऊत / अकोला : किडनी तस्करी प्रकरणामधील पीडित शांताबाई खरात यांच्या किडनीचे प्रत्यारोपण नांदुरा येथील एका महिलेच्या शरीरात करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीवरून पोलीस नांदुरा येथील महिलेची लवकरच ह्यहय़ुमन ल्युकोसाईट अँन्टीजेन रिस्पॉन्सिबल फॉर इमिन्यू सिस्टीम रेग्युलेशन्सह्ण (एचएलए टायपिंग टेस्ट) करणार आहेत. या टेस्टमधून या माहितीवर शिक्कामोर्तब होण्यास मदत होणार आहे.अकोल्यातील रहिवासी आनंद जाधव हा अवैध सावकारीच्या माध्यमातून गरीब रुग्णांना किडनी देण्यास हतबल करायचा. देवेंद्र शिरसाटच्या मदतीने तो किडनीसाठी ग्राहक शोधायचा. ग्राहक शोधल्यानंतर सांगलीचा शिवाजी कोळी हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत होता. या किडनी तस्करांनी जुने शहरातील पाच जणांच्या किडन्या अशाच प्रकारे काढल्या आहेत. त्यापैकी शांताबाई खरात यांची किडनी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली असून, या किडनीचे नांदुरा येथील एका महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी शांताबाई खरातची किडनी बुलडाणा जिल्हय़ातील नांदुरा येथील महिलेच्या शरीरात आहे किंवा नाही, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन एचएलए टायपिंग टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी नांदुर्‍याच्या महिलेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ह्यअल्ट्रासाऊंड सोनोग्राफीह्ण करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये महिलेच्या शरीरात किती किडनी आहेत, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे किंवा नागपूरमध्ये एचएलए टायपिंग टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.*अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीही महत्त्वाचीअल्ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्ये व्यक्तीच्या शरीरात किती किडनी आहेत, हे स्पष्ट होते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असल्यास तिसर्‍या किडनीचे प्रत्यारोपण केली आहे किंवा नाही हे स्पष्ट होते. हे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात नेमकी कुणाची किडनी आहे, हे शोधण्यासाठी एचएलए टायपिंग टेस्ट महत्त्वाची ठरते.*तीन सदस्यीय समितीचा अहवाल सादरजिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी किडनी तस्करी प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना एक प्रश्नावली पाठवली होती. या प्रश्नावलीमधील तांत्रिक मुद्दय़ांवर मार्गदर्शन तसेच कायदेशीर बाजू तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची मार्गदर्शक तत्त्वे यांचा अभ्यास करून तीन सदस्यीय समितीने हा अहवाल मंगळवारी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. या समितीमध्ये औषध वैद्यकशास्त्र डॉ. बनसोड, शल्यचिकित्सक डॉ. आनंद डवंगे व न्यायवैद्यकशास्त्र डॉ. रवी मेश्राम यांचा समावेश होता. या समितीने तीन दिवसांमध्ये हा अभ्यासपूर्ण अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला.