शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘शौचालय’च्या नावावर शहरी भागात अर्जांचा ‘गोरखधंदा’!

By admin | Updated: September 28, 2016 01:36 IST

‘ऑनलाइन’ अर्जासाठी २00 रुपयांची मागणी; ‘लोकमत’ने केला प्रकार उघड.

सुनील काकडे वाशिम, दि. २७- शौचालय बांधकामासाठी २५ हजार रुपये अनुदान मिळवून देण्याची बतावणी करून काही इसमांनी शहरी भागात पैसे लाटण्याचा ह्यगोरखधंदाह्ण सुरू केला आहे. यासाठी प्रती लाभार्थी २00 रुपये घेतले जात असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने २७ सप्टेंबर रोजी केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान उघडकीस आला.राज्यशासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरी भागात वैयक्तिक शौचालय योजना राबविली जात आहे. यासाठी ज्यांच्या घरी अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही आणि जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशा लाभार्थींचा सर्व्हे करून त्यांना शौचालय उभारण्याकरिता शासनाकडून देय असलेले १२ हजार रुपये आणि नगर परिषदेकडून दिले जाणारे प्रोत्साहनपर ५ हजार रुपये, असे एकंदरित १७ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. असे असले तरी नगर परिषदांकडून शहरी भागात ही योजना फारशी गांभीर्याने राबविली जात नसून शौचालयाचा लाभ मिळण्याकरिता दाखल केलेला प्रस्ताव वेळेत निकाली निघत नसल्याची ओरड सर्वच स्तरांतून होत आहे. यामुळे बहुतांश लाभार्थी त्रस्त झाले आहेत.दरम्यान, शहरातील गरजू लाभार्थींच्या याच मानसिकतेचा गैरफायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून काही इसम आर्थिक लाभ करून घेण्याच्या उद्देशाने पुढे सरसावले असून, घरोघरी फिरून शौचालय उभारण्याकरिता नगर परिषदेकडून २५ हजार रुपये मिळवून देण्याची बतावणी केली जात आहे. यासाठी संबंधित कुटुंबाकडून २00 रुपयांची मागणी करून अर्ज भरून घेतले जात असल्याची बाब मंगळवारी ह्यलोकमत स्टिंग ऑपरेशनह्णमध्ये उजागर झाली. तथापि, या गंभीर प्रकाराकडे जिल्ह्यातील नगर परिषदांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून जोर धरत आहे.