शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

स्वच्छ शहरासाठी नगरपालिका सरसावल्या!

By admin | Updated: February 27, 2016 02:08 IST

शौचालय बांधकामाला प्राधान्य: मानो-यातून ‘वराह’ होणार हद्दपार.

वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) जिल्ह्यातील चार नगर परिषद व दोन नगर पंचायत प्रशासनाने कृती आराखडा आखून शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे. मानोरा नगर पंचायतने पहिला प्रयत्न म्हणून शहरातील सर्व वराह शहराबाहेर हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारत अभियानाह्णच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्ण (नागरी) सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शहरी भाग हगणदरीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरे स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. वाशिम शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय योजना धुमधडाक्यात सुरू आहे. २0१७ पर्यंत चालणार्‍या या योजनेसाठी वाशिम नगर परिषदेकडे एक हजार वार्षिक उद्दिष्ट होते. २0 फेब्रुवारीपर्यंत ३२00 च्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहेत. ४३५ लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देण्यात आला. या योजनेंतर्गत गत डिसेंबर १५ मध्ये ७0 लाभार्थ्यांंच्या बँक खात्यात धनादेशाची रक्कम, जानेवारी महिन्यात १00 जणांच्या खात्यात तर त्यानंतर जमा करण्यात आलेल्या धनादेशासह आतापर्यंत ४३५ लाभार्थ्यांंच्या खात्यात शौचालय बांधकामाची रक्कम जमा करण्यात आली. शहरातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले असता, चार हजार १२३ कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे आढळून आले होते. रिसोड नगर परिषदेनेदेखील शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामाला प्राधान्य दिले आहे. शासनाचे अनुदान आणि नगर परिषद स्वत: १0 हजाराचे अनुदान देत असल्याने ६00 च्या वर शौचालय बांधकाम झाले आहे. मंगरुळपीर व कारंजा नगर परिषदेनेदेखील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अँक्शन प्लॅन आखला असून, अंमलबजावणी सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी सत्ता स्थापन झालेल्या मानोरा व मालेगाव नगर पंचायतच्या पदाधिकार्‍यांनीदेखील आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी आढावा बैठकांवर भर दिल्याचे दिसून येते.