शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत अध्यक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: January 15, 2016 02:11 IST

मानोरा, मालेगाव नगर पंचायत निवडणूक.

वाशिम: मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीच्या धक्कादायक निकालाने दिग्गजांना जमिनीवर आणले असून, आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. दरम्यान, मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तर मानोर्‍यात भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे; मात्र ऐनवेळी काही चमत्कार झाला तर धक्कादायक निकालही समोर येऊ शकतो. मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणुकीने बर्‍याच राजकीय उलथापालथी घडविल्या. १0 जानेवारीला मतदान झाल्यानंतर दिग्गजांनी बांधलेले अंदाज ११ जानेवारीच्या मतदानानंतर फोल ठरले. मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मुसंडी मारत तत्कालीन ग्रामपंचायतच्या सत्ताधार्‍यांचा दारुण पराभव केला. शिवसंग्रामने पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उडी घेऊन चार जागा काबीज केल्या. येथे भाजपाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रत्येकी चार अशा आठ जागा पटकावून नगर पंचायतमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळविला. शिवसंग्राम चार, शिवसेना तीन व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केवळ एका जागेची गरज आहे. एका अपक्ष सदस्याला आपल्या तंबूत आणण्यासाठी काँग्रेस-राकाँच्या नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. अपक्ष सदस्य या आघाडीला मिळाला तर नगर पंचायतवर पहिली सत्ता स्थापन करण्याचा मान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मिळू शकतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा अपवाद वगळता अन्य पक्षांची युती होणे अवघड आहे. शिवसंग्राम चार, शिवसेना तीन, भाजपा व अपक्ष प्रत्येकी एक असे नऊ सदस्य एका ठिकाणी बसविण्याची ह्यसर्कसह्ण अवघड असल्याने कुणी पुढाकार घेण्याची शक्यता कमीच आहे. अपक्ष सदस्य गळाला लावून नगर पंचायतवर सत्ता आणण्यासाठी काँग्रेस-राकाँ आघाडीने मोर्चेबांधणी केली आहे. मालेगावचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार काँग्रेसकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मीनाक्षी परमेश्‍वर सावंत हे एकमेव एससी प्रवर्गातील उमेदवार आहेत. काँग्रेस-राकाँची युती असल्याने नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे गेल्यास उपाध्यक्ष पद काँग्रेस की अपक्षाकडे, हा प्रश्न सध्या अनुत्तरीय आहे.