शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड खरेदी बंद ; शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: March 26, 2017 14:07 IST

नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात तूरीची विक्री करावी लागत आहे.

वाशिम - जिल्ह्यातील मानोरा, शिरपूर, अनसिंग यासह अन्य काही बाजार समिती व उपबाजारात नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात तूरीची विक्री करावी लागत आहे. हमीभाव मिळावा यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला ५0५0 रुपये दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन भरघोस झाल्यामुळे यंदा दर घसरले आहेत. अडत्यांकडून तुरीला ४000 ते ४२00 रुपये भाव मिळतो आहे. त्यामुळे ३0 ते १00 क्विंटल तुरीचे उत्पादन झालेला शेतकरी शासकीय तूर खरेदी केंद्रावर गर्दी करीत आहे; परंतु १0 ते १५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी अडत्यांकडे जाऊन तुरीची विक्री करीत आहेत. बाजारात तूर आणण्यासाठी द्यावे लागणारे वाहनाचे भाडे आणि मापासाठी सात ते आठ दिवस करावी लागत असलेली प्रतीक्षा लक्षात घेता, वाहनमालकाला भाडे देणे शक्य नसल्याने, किरकोळ शेतकरी अडत्याकडे जात आहेत; परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरसह इतर मालवाहू वाहने आहेत. तेच नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अडत्याच्या तुलनेत नाफेडचा भाव अधिक असल्यामुळे शेतकरी खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतिक्षा करीत आहेत.