शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जखमीच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: October 14, 2015 02:02 IST

अनसिंग येथील हल्लाप्रकरण.

अनसिंग (जि. वाशिम): पूर्ववैमनस्यातून उद्भवलेल्या वादात गंभीर जखमी झालेल्या जयपूर येथील रामराव राठोड यांचा १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध अनसिंग पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या जयपूर येथील रामराव राठोड हे शेतीचा व्यवसाय करीत. शेतीच्या वादावरून त्यांच्या शेजारी असलेल्या सिद्धू अंबादास गादेकर व इतर चौघांनी संगनमत करून १२ मे २0१४ रोजी कुर्‍हाडीने जखमी केले होते. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण आपसात करण्यासाठी गादेकर दबाव आणत असल्याचा आरोप राठोड यांनी केला होता. याला नकार दिल्याने गादेकर याने ६ ऑक्टोबर रोजी धारदार शस्त्राने पोटामध्ये वार करून राठोड यांना गंभीर जखमी केले. राठोड यांना उपचारार्थ यवतमाळ येथे दाखल केले होते. दरम्यान, १३ ऑक्टोबरला राठोड यांचा मृत्यू झाल्याने अंबादास किसन गादेकर, दत्ता किसन गादेकर, शुभम अंबादास गादेकर, सिद्धू अंबादास गादेकर, सुनीता अंबादास गादेकर व सचिन दवणे या सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.