शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा येथे मुद्रा योजनेचा गजर

By admin | Updated: March 27, 2017 15:31 IST

मानोरा येथे सोमवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा उत्साहात पार पडला.

मानोरा : जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व मानोरा तहसील कार्यालयाच्यावतीने मानोरा येथे सोमवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा उत्साहात पार पडला.मेळाव्याला ह्यनाबार्डह्णचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, नायब तहसीलदार एस. बी. तायडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नागराळे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक काटोले, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखा प्रबंधक विलास चेटोले, मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. जे. वाघमारे, कारंजा पंचायत समितीच्या गट समन्वयक वर्षा ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी खंडरे म्हणाले की, शेतीचा खर्च वाढत चालल्याने आज शेती तोट्यात आली आहे. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग, व्यवसाय सुरु करणे आवश्यक बनले आहे. हे उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना एक नवी संधी आहे. लहान-मोठ्या उद्योग, व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या या योजनेतून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी आपला छोटासा उद्योग, व्यवसाय उभारावा. तसेच यामाध्यमातून इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन खंडरे यांनी केले. स्टेट बँक आॅफ इंडियाचे सह प्रबंधक काटोले यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रतेचे निकष याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी मुद्रा योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नागराळे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रकाश खाटिक यांनी केले.