शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला हवेत ४१.४५ कोटी, वसुली १३.४७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

महावितरण वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बांधिल असली तरी वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा करायला ...

महावितरण वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी बांधिल असली तरी वीज ग्राहकांनी आपल्याकडील वीज देयकांचा नियमित आणि वेळेत भरणा करायला हवा; परंतु तसे होताना दिसत नाही. महावितरणचा डोलारा चालवायचा असेल तर वितरित केलेल्या प्रत्येक युनिटची वसुली होणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कृषीपंप, पथदिवे आणि ग्रामपंचायतींची १८ कोटी १७ लाख थकबाकी वगळता वाशिम जिल्ह्यात ४१ कोटी ४५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीमही राबविली, परंतु २५ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी केवळ १३ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची वसुली जिल्ह्यात होऊ शकली आहे. त्यामुळे उर्वरित २७ काेटी ९३ लाखांची थकबाकी वसूल कशी करणार, असा प्रश्न आहे. ही थकबाकी वसूल व्हावी म्हणून थकबाकीदारांकडून सहकार्य न मिळाल्यास कारवाई करण्याचा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे.

-----------------

प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला उद्दिष्ट

महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी प्रचंड वाढल्याने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यात अधिकाधिक वसुली होण्याच्या उद्देशाने प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. एवढेच नाही तर वसुली मोहिमा व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याने या मोहिमेत कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

----------------------

तालुकानिहाय थकबाकीचे उद्दिष्ट आणि वसुली (लाखांत)

तालुका - उद्दिष्ट - वसुली

कारंजा - ९३०.०० - ३१८.८३

मालेगाव - ५.६० - १२५.०२

मं.पीर - ५.०० १४२.५४

मानोरा - ३.४४ ७१.६८

रिसोड - ६.४६ १२७.६६

वाशिम - ११.६५ ३७३.५२

---------------------

एकूण ४१.४५

-----------------

कोट : वाशिम जिल्ह्यास कृषी पंप, पथदिवे आणि ग्रामपंचायतीची थकबाकी वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी ४१.३५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा कारवाईचा पवित्रा घ्यावा लागेल.

-रत्नदीप तायडे,

कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम