साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या नामदेव कांबळे उपाख्य ना.चं. यांचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी २६ जानेवारी रोजी घरी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान केला.यावेळी कांबळे यांनी जादा वीज देयकाची समस्याही पालकमंत्र्यांसमोर मांडली.ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे जिल्ह्याचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक होईल, असे पालकमंत्री देसाई म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कांबळे यांनी स्वलिखित ‘राघववेळ’ ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी पालकमंत्र्यांना भेट दिली. जादा वीज देयकप्रकरणी लक्ष घालू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी कांबळे यांना दिले.
पालकमंत्री महोदय, जादा वीज देयकाकडे लक्ष द्या हो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:30 IST