शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघातील रस्त्यांबाबत खासदार गवळी यांनी लोकसभेत मांडला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

यावेळी खासदार गवळी यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात हायवेचे काम प्रगतिपथावर असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण करून घेतले आहे. ...

यावेळी खासदार गवळी यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात हायवेचे काम प्रगतिपथावर असून सुमारे ९० टक्के काम पूर्ण करून घेतले आहे. मात्र आता उर्वरित १० टक्के काम कधी पूर्ण करणार आहात, असा प्रश्न त्यांनी संसदेत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करत सदर कामांचा पाठपुरावा करण्याकरिता आपण हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित केला असल्याचे खासदार गवळी यांनी प्रश्नोत्तरादरम्यान सांगितले. यावेळी खासदार गवळी यांनी वाशिम जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश असून आपल्या मतदारसंघात अजूनही रस्त्यांची बरीच कामे रखडलेली आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरींनी ती कामेसुद्धा मंजूर करून द्यावी असे म्हटले असता गडकरी यांनी खासदार गवळींनी यापूर्वी सांगितलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तरीही खासदार गवळी जी कोणती कामे सांगतील ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे ठोस आश्वासन दिले. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या व आकांक्षित जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कटिबद्ध असून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असेही आश्वासन नितीन गडकरी यांनी खासदार गवळी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.

.....................

रस्ता कामासाठी निधी कमी पडणार नाही

हायवेचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी संसदेत मांडला व याबाबत थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना यावर मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्यात. गडकरी यांनी सुध्दा आपल्याकडे निधीची कमतरता नाही. तुमच्या जिल्ह्यातील कामासाठी निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन भावना गवळी यांना दिले.