शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

लघू उद्योगासाठी मुद्रा योजना फायदेशीर!

By admin | Updated: March 22, 2017 03:02 IST

तहसीलदारांचे प्रतिपादन ; रिसोड येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा.

रिसोड, दि.२१- मुद्रा योजनेतून सहज व कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना स्वत:चा लघू उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. गरजू, होतकरू बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन आपला उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन तहसीलदार अमोल कुंभार यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व रिसोड तहसीलदार कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विजय खंडारे होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय नगराळे, अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक प्रदीपकुमार मिश्रा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सौरभ देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. तहसीलदार कुंभार म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतून लघू व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी तसेच ते त्यांचा विस्तार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. या योजनेविषयी युवकांना माहिती मिळावी, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून माहिती प्राप्त करून घेऊन, आपल्या व्यवसायाची निवड करून बँकेकडे परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे सांगितले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नगराळे म्हणाले की, जिल्ह्यातील होतकरू बेरोजगार युवक-युवतींना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून मुद्रा कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून, जास्तीत जास्त लोकांपयर्ंत मुद्रा योजनेची माहिती पोहोचविणे हा मेळाव्यांचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. नाबार्डचे खंडारे म्हणाले, बेरोजगार, होतकरू युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांनी समाजाची गरज ओळखून व्यवसायाची निवड करावी व त्यानुसार उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी बँकेकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन केले.यावेळी अलाहाबाद बँकेचे व्यवस्थापक मिश्रा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केलेल्या अल्ताब हुसेन व विशाल राठोड या युवकांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले.