शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

मोहगव्हाण, उध्र्व मोर्णा प्रकल्पातून होणार सिंचन

By admin | Updated: November 8, 2016 02:06 IST

रब्बी हंगामातील पिकांना मिळणार फायदा; शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन.

वाशिम, दि. ७- जिल्ह्यातील मोहगव्हाण, उध्र्व मोर्णा या लघुपाटबंधारे योजनांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. याकरिता शेतकर्‍यांनी पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून अर्ज सादर करावे, असे आवाहन अकोला लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांनी सोमवारी केले.सदर प्रकल्पांमधून रब्बी हंगाम २0१६-१७ चे नियोजन करण्यात आले आहे. उध्र्व मोर्णा प्रकल्पांतर्गत येणार्‍या लाभार्थींंंनी आपल्या क्षेत्रातील केवळ मंजूर क्षेत्राकरिताच पाणी मागणी अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंंंत संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे प्रत्यक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवावेत. मोहगव्हाण प्रकल्पाचे लाभक्षेत्र पाणीवाटप संस्थेकडे हस्तांतरित झाले असल्यामुळे या प्रकल्पावरील लाभधारकांनी आपल्या क्षेत्रातील पाणीवापर संस्थेकडे अर्ज भरणे आवश्यक आहे. हरभरा, तूर, करडी, सूर्यफूल आदी कमी पाणी लागणार्‍या पिकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्याचे नियोजन आहे. कोणत्या धरणावर, कोणत्या कालव्यावर, कोणत्या गेटपयर्ंत पाणी मिळू शकेल, याबाबतची सविस्तर माहिती संबंधित उपविभागाशी, पाणी वापर संस्थेशी संपर्क करून घ्यावी. पाणी मागणी अर्ज असणे आवश्यक आहे. पाणी मागणी अर्ज करणारा शेतकरी स्वत: शेतीचा मालक असणे आवश्यक आहे. कुळ अगर वहीतदार असलेल्या शेतासाठी मागणी अर्जांंंसोबत मालकाचे संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. थकबाकीदार अर्जदारांना सिंचनासाठी पाणी पुरविले जाणार नाही.