जऊळका रेल्वे : आपल्या आजीसह खाटेवर झोपलेल्या १0 वर्षाच्या चिमुकलीचा ३३ वर्षीय इसमाने विनयभंग केल्याचा घृणास्पद प्रकार स्थानिक झोपडपट्टी परिसरात २0 जूलैच्या रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणात पिडीत मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादिवरुन जउळका पोलिसांनी एकास अटक केली आहे. अटक केलेल्या इसमाचे नाव अनिल भिकाजी फटांगळे असून तो मूळचा अकोल्यातील तारफैल भागातील रहिवासी आहे. फिर्यादिनुसार पिडीत कुटुंब जउळका रेल्वे येथील झोपडपट्टी परिसरात ते राहतात. २0 जूलैच्या रात्री पिडीत मुलगी तिच्या आजीसह खाटेवर झोपलेली होती तर फिर्यादी व त्याची पत्नी घरातच दूसरीकडे झोपलेले होते. रात्री जवळपास १0.३0 वाजताचे सुमारास झोपडपट्टी भागातच चार-सहा महिन्यापासून राहणारा अनिल फटांगळे हा फिर्यादिच्या घरात अनधिकृतपणे घूसला. त्याने १0 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केला. त्यामुळे झोपेतून जागी झालेल्या चिमुकलीने आरडाओरड केल्याने घरातील सर्व जागे झाले. त्यावेळी अनिल फटांगळे हा चिमुकली व तिची आजी झोपलेल्या खाटेखालीच लपला. काय झाले म्हणून जागे झालेल्या घरातील सर्वांनी खाटेखाली लपलेल्या अनिलला बाहेर काढून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पिडीत मुलीच्या पित्याच्या फिर्यादिवरुन अनिल फटांगळेविरुध्द भादंविच्या कलम ४५२, ३५४ (अ), कलम ७ बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा २0१२ नुसार एफआयआर दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक केली. याप्रकरणाचा पूढील तपास ठाणेदार प्यारसिंग मानलवी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मनोहर अष्टोनकर त्यांचे सहकारी शिवाजी काळे, संदिप निखाडे आदी करीत आहेत. कवरदरी येथील दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनेला पाच दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच चिमुकलीचा विनयंभग करण्याच्या घडलेल्या घटनेने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
जउळका रेल्वे येथे चिमुकलीचा विनयभंग
By admin | Updated: July 21, 2014 23:07 IST