शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

मंगरुळपीरमधील स्मारक जपतेय अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:44 IST

अण्णाभाऊ साठे स्मृती दिन: विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांतून प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: मातंग समाजाच्या उद्धारासाठी झटणारे तुकाराम भाऊराव ऊर्फ साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपण्याचे कार्य महत्त्वपूर्ण कार्य मंगरुळपीर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक गेल्या २२ वर्षांपासून करीत आहे. मंगळवार १८ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त या ठिकाणी विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. मातंग समाजासह, दलितांमधील शोषीत समाजाच्या व्यथा त्यांनी ताकदीने आपल्या लेखणीतून मांडल्या. अशा महान व्यक्तीमत्त्वाच्या स्मृती जपण्याचे कार्य मंगरुळपीर येथील अण्णाभाऊ साठे स्मारक करीत आहे. शहरातून जाणाऱ्या वाशिम मार्गावर शासकीय गोदाम परिसरात १९९५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त भगवानराव पिसोळे यांनी या स्मारकाची निर्मिती केली. या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती या नावाने स्थापन करण्यात आलेली ही समिती गेल्या २२ वर्षांपासून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपत आहे. या समितीकडून स्मारकाची देखरेख करण्यासह सौंदर्यीकरणाचे कामही करण्यात आले. यासाठी गंगाधर कांबळे, अनिक गायकवाड, गजानन गायकवाड, मधुकर खंडारे, सुनिल भोंगळ, राजू आवारे आदि मंडळीचे महत्त्वाचे योगदान आहे. मंगळवारी या समितीच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.