शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत गतिरोधकाचा मुद्दा गाजला

By admin | Updated: May 30, 2017 19:55 IST

वाशिम : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी शहरातील अनधिकृत गतिरोधकांचा मुद्दा गाजला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून, यावेळी शहरातील अनधिकृत गतिरोधकांचा मुद्दा गाजला. या बैठकीमध्ये नगरपरिषद, वीज वितरण, बँक, रस्ते वाहतूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विजकुमार सवडतकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, मंगरूळपीर नगर परिषदेचे पी. डी. गणेशपुरे, महावितरणचे व्ही. आर. जामकर यांच्यासह गजानन साळी, रमेशचंद्र बज, धनंजय जतकर, नामदेव बोरचाटे, रजणी गावंडे आदी अशासकीय सदस्य उपस्थित होते.नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांवर तयार करण्यात आलेले अनधिकृत गतिरोधक हटविण्यात यावीत, अशी मागणी यावेळी अशासकीय सदस्यांनी केली. गतिरोधकामुळे वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच ज्याठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या परिसरात जड वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. महावितरणमार्फत वीज ग्राहकांना अनेकदा चुकीची वीज बिले दिली जात असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे सांगून वीज बिल अचूक व नियमित वेळेत मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दाही अशासकीय सदस्यांनी मांडला. या बैठकीमध्ये चर्चेस आलेले सर्व मुद्दे तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी खंडागळे यांनी दिल्या.