शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

वाशिम : कोरोना नियमांचे काटेकोर पालन म्हणून घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावले जात आहे. दुसरीकडे मास्कमुळे त्वचेला खाज सुटण्याबरोबरच ...

वाशिम : कोरोना नियमांचे काटेकोर पालन म्हणून घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावले जात आहे. दुसरीकडे मास्कमुळे त्वचेला खाज सुटण्याबरोबरच इतरही त्वचारोग उद्भवत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले. पण मास्कच्या वापरामुळे काही जणांना चेहऱ्यावर बारीक पुरळ, त्वचेला खाज सुटणे आणि रॅशेजचा त्रास होत असल्याचे दिसत आहे.

०००

मास्क आवश्यकच, पण असे करा त्वचेचे रक्षण..!

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क आवश्यकच आहे. चेहऱ्यावर मास्क घट्ट बांधल्याने श्वास घेतानाही अडचणी निर्माण होतात. घाम, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल (तेलकट त्वचा), धूळ, मातीचे कण चेहऱ्यावर लावलेल्या मास्कवर जमा होतात. वापरत असलेले मास्क स्वच्छ आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. चेहरा नियमितपणे साबणाने धुणे गरजेचे आहे. तोंडाला घट्ट होणारे मास्क वापरणे टाळा. सैल असलेल्या मास्कचा वापर करावा. शक्यतोवर एन-९५ किंवा सर्जिकल मास्कचा वापर करावा. कापडी मास्क वापरत असाल तर ते नीट धुणे आणि सुकवणे अतिशय आवश्यक आहे. कापडी मास्कवर सूक्ष्म जीवजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.

०००००००००००००००

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे सतत ते वापरले तर त्वचेला खाज सुटण्याचे प्रकार वाढतात. हात धुण्याची सुविधा उपलब्ध नसेल तरच सॅनिटायझरचा वापर करणे योग्य ठरते. जेथे हात धुण्याची व्यवस्था आहे ,तेथे शक्यतोवर सॅनिटायझर न वापरता साबण आणि पाण्याने हात धुवावे.

०००००००००००००००००

त्वचाविकाराचे रुग्ण वाढले

कोट

मास्कमुळे विविध प्रकारचे त्वचाविकार जडत असल्याचे रुग्ण येत आहेत. डिस्पोजल मास्क दररोज बदलायला हवा. एकच मास्क वारंवार वापरल्यास त्वचेचे विकार होण्याची भीती आहे.

- डॉ. विठ्ठल गोटे

त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम.

००००

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यकच आहे. शक्यतोवर सैल असलेला मास्क वापरावा. एक मास्क एका दिवसापुरताच वापरावा.

- डॉ. नीलिमा चव्हाण

त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम.