शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीरमधील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अखेर सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:06 IST

मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे वसतीगृह यंदा सुरू न झाल्याने गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत लोकमतने ‘मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्यानंतर खोली भाड्याने घेऊन शिक्षण घ्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. ही बाब लक्षात घेत शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याणमार्फत तालुकास्तरावर भव्य वसतीगृहाची निर्मिती करुन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. शासनाच्या या निर्णयानुसार मंगरुळपीर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह उभारण्यात आले, मात्र यंदाचे सत्र सुरू झाल्यानंतरही हे शासकीय वसतीगृह श् केवळ पाण्याचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत होतेच. शिवाय घरुन शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागून शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे कठीण झाले होते. ही बाब गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देऊन वसतीगृह सुरु करणे नितांत गरजेची असल्याची मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येत होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या वसतीगृृहात आवश्यक सुविधांची पूर्तता करीत ते सुरू केले. इतर सुविधांही उपलब्ध करणार गतवर्षी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाले नाही, तसेच या ठिकाणी व्यायाम शाळा आहे. मात्र साहित्य नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अशा अनेक समस्या या वसतीगृहात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.