शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याबराेबरच वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

नंदकिशोर नारे वाशिम : राज्यात महाआघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्यातही महाविकास ...

नंदकिशोर नारे

वाशिम : राज्यात महाआघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र आहेत. जिल्ह्यातही महाविकास आघाडी साथ साथ दिसत असून, जिल्हा परिषदेसह, तीन पंचायत समित्यांमध्ये आघाडी एकत्र नांदत आहेत.

जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये मात्र आघाडीला यश न मिळाल्याने इतरांची सत्ता आहे. वाशिम नगरपालिकेचे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आल्याने शिवसेनेचे आहेत. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या बाेटावर माेजण्याइतपत असल्याने येथे आघाडीची सत्ता म्हणता येणार नाही, असे असले तरी जिल्ह्यात शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस साेबत दिसून येतात.

----------

पंचायत समिती

जिल्ह्यातील ६ पंचायत समित्यांपैकी वाशिम, कारंजा, मंगरुळपीर या तीन ठिकाणी महाविकास आघाडी असून, रिसाेडात अनंतराव, मालेगावात अनंतराव, रा. काॅ. तर मानाेऱ्यात भाजप.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. रा. काॅं. १२, काॅंग्रेस ९, तर शिवसेनेचे ६ सदस्य आहेत, तर भाजप ६, वंचित ८, अनंतराव देशमुख ७, अपक्ष ४ सदस्य आहेत.

नगर पालिका

नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष असून, भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक नगरपालिकेत कमी आहेत.

---------

तीन पक्ष, तीन विचार

जिल्हा परिषद पाेटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली हाेती. तिघेही एकत्र निवडणूक लढण्यासाठी पक्ष नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून दिसून येत हाेते.

जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यावर काेणताही निर्णय न झाल्याने शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवारीसाठी तयारी केली हाेती.

जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांचे मनाेमिलन न झाल्याने एकमेकाविरूध्द निवडणूक रिंगणात उतरले हाेते. ऐनवेळी निवडणूक रद्द झाल्याने मात्र सर्वांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.

------

पक्षांचे जिल्हाप्रमुख म्हणतात...

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही आम्ही महाविकास आघाडीतील पक्षासाेबत राहताे.

- सुरेश मापारी,

शिवसेना, जिल्हाध्यक्ष

-------

पक्षश्रेष्ठी यांच्याकडून येत असलेल्या सर्व नियमांचे पालन करून महाविकास आघाडी नियमांचे पालन जिल्ह्यात सुरू आहे. आघाडी व्यवस्थित आहे.

- ॲड. दिलीपराव सरनाईक,

काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष

--------

राज्याप्रमाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत असलेले सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व साेबत राहून कार्य करीत आहेत.

- चंद्रकांत ठाकरे,

राष्ट्रवादी काॅंग्रेस, जिल्हाध्यक्ष