शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

महा ई-सेवा केंद्राचा वेग मंदावला

By admin | Updated: August 1, 2014 02:19 IST

वाशिम जिल्हय़ात सातबारासाठी शेतकर्‍यांच्या रांगा.

वाशिम : शासकीय यंत्रणेवरील ह्यताणह्ण कमी करण्याबरोबरच विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, प्रतिज्ञालेख नागरिकांना तातडीने मिळण्याची सुविधा म्हणून शासनाने जिल्हा ते गाव पातळीवर महा ई-सेवा केंद्राचा ह्यसेतुह्ण निर्माण केला आहे; मात्र या केंद्रातील ऑनलाईनचे सॉफ्टवेअर मंद गतीने चालत असल्याने शेतकर्‍यांना एका सातबार्‍यासाठी तास-न-तास हेलपाटे घ्यावे लागत आहेत. जिल्हय़ातील सर्व महा ई-सेवा केंद्राची ही परिस्थिती असून, यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली असता, ही अडचण संपूर्ण महाराष्ट्रातच असल्याचे त्यांनी सांगितले.खरीप पीकविमा योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै होती. यामध्ये वाढ करण्यात आली, याची कल्पना जिल्हय़ातील बर्‍याच शेतकर्‍यांना नसल्याने सकाळपासूनच महा ई-सेवा केंद्रावर मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांनी गर्दी केली. शेतकर्‍यांच्या केंद्रासमोर अक्षरश: लांबच्या लांब रांगा लागल्यात; मात्र लागलेल्या रांगा पुढे सरकत नाहीत म्हणून शेतकरी वैतागून आरडाओरड करू लागले. त्यावेळी अनेक केंद्रांवरील कर्मचार्‍याने शेतकर्‍यांना ह्यसर्व्हरच स्लो आहे तर आम्ही का हाताने फिरवावेह्ण, असे सांगितले. हीच परिस्थिती जिल्हय़ातील प्रत्येक केंद्रावर असल्याचे आमच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीवरून लक्षात आले.शासनाने शेतकर्‍यांच्या पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना आणली. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्‍चित करण्यासाठी खरीप २0१४ हंगामात सर्व विमा अधिसुचित क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. अल्प, अत्यल्प शेतकर्‍यांना विमा हप्तामध्ये ५0 टक्के सवलत असून, कापूस पिकासाठी विमा हप्त्यामध्ये अल्प-अत्यल्प भूधारकासाठी ७५ टक्के सवलत आहे. इतर भूधारकांसाठी ५0 टक्के सवलत देण्यात आली आहे. खरीप हंगामात विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २0१४ होती. आता सदर मुदत १६ ऑगस्ट २0१४ पर्यंत वाढविण्यात आली आहे; पण याबाबत बर्‍याच जणांना कल्पना नसल्याने गर्दीत वाढ झाली होती; तसेच याबाबत अनेक जण अनभिज्ञ दिसून आले.वाशिम जिल्हय़ातील मालेगाव, शिरपूर, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड, शेलुबाजारसह वाशिम शहरातील महा ई-सेवा केंद्रावर काम झपाट्याने होत नसल्याने सर्वच शेतकरी त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. या प्रकारामुळे अनेक ठिकाणी केंद्राच्या संचालक व नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात वाद होत आहेत. मालेगाव शहरात असलेल्या प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर चिक्कार गर्दी दिसून आली. वाशिम तालुक्याचे तहसीलदार आशीष बिजवल यांनी सर्व्हर मंदगतीने चालत असल्याने शेतकर्‍यांना एका सातबारासाठी तास न तास उभे रहावे लागत असल्याचे सांगीतले. संबंधित समन्वयकाशी चर्चा करतो व सदर अडचण दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.