शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

रोहयो कक्षाला ठोकले कुलूप!

By admin | Updated: June 17, 2017 19:33 IST

कर्मचा-यांअभावी सिंचन विहीरीचे कामे रखडले; रिसोडमधील प्रकार, सिंचन विहीर लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : पंचायत समितीमधील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या क क्षात कर्मचार्‍यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या पंचायत समिती अंतर्गत मंजूर ४00 सिंचन विहिरींचे काम रखडले आहे. या प्र्रकारामुळे संतापलेल्या लाभार्थींसह पंचायत समिती उपसभापती महादेवराव ठाकरेसह तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समितीमधी रोहयो कक्षाला शुक्रवारी कुलूप ठोकले.स्थानिक पंचायत समिती अंतर्गत जवळपास ४00 सिंचन विहीरी मंजूर आहेत; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे पंचायत समिती मग्रारोहयो कक्षातील एपिओ, पिटीओ, संगणक परिचालकांच्या रिसोड इतर तालुक्यात बदल्या केल्या असून, त्यांच्या जागेवर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या आठवडयात मग्रारोहयो अंतगत सुरु असलेल्या सिंचन विहीरीची कामे ठप्प झालेली आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे काही दिवसातच सिंचन विहिरींचे मस्टर बंद होतील. या भितीने सिंचन विहीर लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबीकडे मग्रारोहयो जिल्हाधिकारी कार्यालय व गटविकास अधिकारी, मग्रारोहयो कक्ष जि.प.वाशिम यांचे मुळीच लक्ष नाही. रोहयोच्या कामांत अडथळा निर्माण करण्याचे काम वरिष्ठ कार्यालय करिता असल्यामुळे तालुक्यात पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेच्या लक्षांकाप्रमाणे १000 विहीरीही प्रत्येक तालुक्यात सुर होऊ शकल्या नाहीत अनेक सिंचन विहीर लाभाथीर्ंच्या अजार्ची चौकशी तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत करुन अनेक पात्र लाभार्थी अपात्र केले तर अपात्र लाभार्थी पात्र केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांवर प्रशासनामुळे अन्याय झाला आहे. या आठवडयात पं.स.कार्यालयात रोहयो कक्षात कुणीही हजर नसल्यामुळे राजेगार सेवकांना खाली हाताने गावाकडे परत जावे लागत आहे. रोहयो कक्षात संगणक संच, प्रिंटर व महत्वाचीे कामदपत्रे उघडयावर असल्यामुळे ती गहाळ होऊ नये याबाबीची दक्षता घेऊन पंचायत समिती उपसभापती महादेवराव ठाकरे यांनी रोहयोच्या कक्षाला कुलूप लावण्याची सूचना गटविकास अधिकारी एम.सी.श्रृंगारे यांना दिली आणि तात्काळ मग्रोहरोयोच्या कक्षाला १७ जून रोजी दुपारी १ वाजता कुलुप ठोकण्यात आले. यावेळी उपसभापती महादेवराव ठाकरे, गटविकास अधिकारी एम.सी.श्रृंगारे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सिंचन विहीर लाभार्थी, रोजगार सेवक आदी उपस्थित होते.