वाशिम : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून वृक्ष लावगड करण्याचा नियम ग्राम पंचायत प्रशासन ह्यकागदाह्णपुरताच र्मयादीत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गतवर्षी १२0 च्या आसपास तर यावर्षी जेमतेम ४0 ते ४५ ग्राम पंचायतींनीच वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविल्याची शोकांतिका आहे.शासनाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत ग्राम पंचायतींचा सहभाग बंधनकारक करण्यात आला आहे. २0१३-१४ आणि २0१४-१५ या दोन वर्षात जिल्ह्यातील ४९३ पैकी जेमतेम ११0 ते १३0 ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. चालू वर्षी वाशिम तालुका एक, मंगरुळपीर दोन, मालेगाव शून्य, रिसोड १४ असे चित्र आहे. देपुळ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून वृक्ष लावगड करण्याच्या नियमाला वाशिम पंचायत समितीसह ग्रामपंचायत प्रशासन पद्ध तीशीरपणे फाटा देत असल्याची माहिती समोर येत आहे. गतवर्षी चार आणि यावर्षी केवळ उकळीपेन या एका ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड योजनेत सहभाग नोंदविला आहे.एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लावगडीसाठी विविध उ पक्रम राबवित आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, शतकोटी वृक्ष लावगड आदींच्या माध्यमातून कोटयवधी रुपये खर्ची घातले जात आहेत. वाशिम पंचायत समितीअंतर्गत येणार्या ८४ ग्राम पंचायतीपैकी सन २0१३-१४ या वर्षामध्ये उकळीपेन ५ हजार, काजळंबा १ हजार, काटा १ हजार, आसोला जहाँगीर ३0५ या चार ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड केली आहे तर सन २0१४ -१५ या वर्षामध्ये उकळीपेन या एका ग्राम पंचायतीने २ हजार वृक्ष लागवड केली आहे तर धानोरा खुर्द व सुराळा येथील प्रस्ताव प्रलंबित आहेत. मंगरुळपीर : मंगरुळपीर पंचायत समितींतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी ७६ पैकी २९ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. गेल्या वर्षी मंगरूळपीर पंचायत समितीला २ लाख ५0 हजारांचे उदिष्ट होते. त्यापैकी फक्त ९९ हजार १00 झाडे लावण्या त आली. २0१४-२0१५ या चालु वर्षात प्रत्येक ग्राम पंचायतीला १ हजार झाडांचे उदिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी केवळ तर्हाळा ग्राम पंचायतीने ५00 झाडे लावली व पारवा ग्राम पंचायतीने दोन हजार झाडे लावुन राष्ट्रीय योजनेत सहभाग घेतला आहे. वृक्ष लागवडीत सहभाग न घेणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई होणे गरजेचे आहे.
*वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अनिश्चितपर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने वृक्ष लागवड मोहिम हाती घेऊन प्रत्येक ग्राम पंचायतींचा सहभाग बंधनकारक केला आहे. जिल्ह्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी यावर्षी जेमतेम ४0 ते ४५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी हा आकडा १00 च्या आसपास होता. वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी मात्र निश्चित नस ते. त्यामुळे जीवंत झाडांची संख्या वृक्षारोपणाच्या तुलनेत अत्यल्प असते. या पृष्ठभूमीवर वृक्ष संवर्धनाचे उद्दिष्ठही तालुकानिहाय निश्चित करणे गरजेचे ठरत आहे.
*वृक्ष लागवडीबाबत पंचायत समिती प्रशासन उदासीनच!रिसोड तालुक्यात यावर्षी १४ ग्राम पंचायत प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती गटविकास अधिकारी घसाळकर यांनी दिली. इतर पंचायत समितीच्या तुलनेत रिसोडचा आकडा जास्त आहे. मात्र, वनांखालील क्षेत्राचा विचार करता अधिकाधिक प्रमाणात ग्राम पंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतींचा आढावा घेणे आवश्यक ठरत आहे.कारंजा पंचायत समितींतर्गत येणार्या ग्रामपंचाय तींनीदेखील वृक्ष लागवड मोहिमेला केराची टोपली दाखविण्यातच धन्यता मानली असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीवर देखरेख ठेवणार्या पंचायत समिती प्रशासनाचेही याकडे थोडे दुर्लक्षच होत आहे.मालेगाव पंचायत समितींतर्गत येणार्या जवळपास २0 ते २५ ग्रामपंचायतींनी गतवर्षी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविला होता. २0१४-१५ या वर्षात एकाही ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविणे बंधनकारक आहे. मात्र, वरिष्ठ यंत्रणेकडून पाठपुरावा होत नसल्याने वृक्ष लागवडीचा बट्टय़ाबोळ होत आहे.