शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

४२ टक्के शेतक-यांची पीक विम्याकडे पाठ!

By admin | Updated: August 23, 2016 23:43 IST

वाशिम जिल्ह्यात २.४0 लाख शेतकरी; योजनेत प्रत्यक्ष सहभागी शेतकरी केवळ १.२९ लाख.

वाशिम, दि. २३ : दोनवेळा मुदत वाढवून देवूनही प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे जिल्ह्यातील तब्बल ४२ टक्के शेतकर्‍यांनी पाठ फिरवली. २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविल्याची बाब समोर आली आहे. राज्यशासनाच्या पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्‍यांना गत खरीप हंगामात पीकविमा मंजूर झाला होता. मात्र, पीकविम्याची रक्कम अदा करताना अनेक शेतकर्‍यांना नुकसानाच्या तुलनेत अगदीच तुटपूंजी रक्कम मिळाली. यामुळे पीकविम्याबाबत बहुतांश शेतकर्‍यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. यामुळेच की काय, यंदा तब्बल दोनवेळा मुदतवाढ देवूनही १0 ऑगस्ट या शेवटच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविण्याबाबत उत्साह दाखविला. इतर सुमारे ४0 टक्के शेतकर्‍यांनी शासनाच्या या उपक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. ह्यलीड बँकह्ण व कृषी विभागात असमन्वयाचे वातावरणपंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतीम मुदत १0 ऑगस्ट होती. त्यास सद्या १३ दिवसाचा कालावधी उलटला. असे असताना अंतीम मुदतीपर्यंत किती शेतकर्‍यांनी प्रत्यक्षात विमा उतरविला, याची अद्ययावत माहिती कृषी विभागाकडे नाही. यासंदर्भात कृषी विभागातील संबंधिताशी चर्चा केली असता, ९४ हजार शेतकर्‍यांनी विमा उतरविल्याचे सांगण्यात आले. लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी मात्र १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला, अशी माहिती दिली. यावरून कृषी विभाग आणि लीड बँकेमध्ये विमा योजनेसंबंधी पुरते असमन्वयाचे वातावरण असल्याची बाब सिद्ध झाली. तथापि, कृषी विभागाच्या या धोरणामुळे विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्‍यांपैकी १0 ऑगस्टपर्यंत १ लाख २९ हजार शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. संबंधितांचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे लवकरच पाठविले जाणार आहेत. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालाही माहिती पुरविण्यात आली आहे.- एस.एस.मेहताव्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम