शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ातील १९५ भूमिहीनांना आता मिळणार जमीन

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा सुखद परिनाम.

संतोष वानखडे / वाशिम: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेने अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीनांना शेतकर्‍यांच्या पंक्तीत बसविण्याचे काम वाशिम जिल्हय़ात केले आहे. २00६ ते २0१४ या दरम्यान जिल्हय़ात ७५५ एकर जमीन उपलब्ध झाल्याने १९५ भूमिहीन लाभार्थींच्या नावावर सात-बारा तयार झाला आहे. गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीनांना दोन एकर बागायत तर चार एकर कोरडवाहू जमीन दिली जाते. जमीन खरेदीसाठी शासनाकडून ५0 टक्के अनुदान, तर उर्वरित ५0 टक्के रक्कम १0 वर्षांसाठी बिनव्याजी स्वरूपात दिली जाते; पात्र लाभार्थींना जमीन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला, तर लाभार्थींना जमीन दिली जाते. २00४ ते २0१४ या १0 वर्षात सहा वेळा जमीन उपलब्ध झाल्याने याचा फायदा १९५ भूमिहीन शेतकर्‍यांना झाला. चार वर्षे जमीन उपलब्धच झाली नसल्याने त्या-त्या वर्षी सदर योजना निधी असूनही ठप्पच राहिली. शासनाने प्रथम जमीन खरेदी केली आणि नंतर त्या जमिनीचे वाटप १९५ भूमिहीनांना केले. २0१४-१५ या वर्षात सदर योजनेंतर्गत ३0 एकर जमीन उपलब्ध झाल्याने प्राप्त प्रस्तावांमधून या जमिनींचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान , समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम जी वाठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या योजनेंतर्गत जमीन उपलब्ध झाल्यानंतर पात्र लाभार्थींकडून अर्ज मागविले जातात. उपलब्ध जमिनीनुसार जिल्हा निवड समिती ईश्‍वरचिठ्ठीतून लाभार्थींची निवड करते. आतापर्यंत १९५ लाभार्थींंना ७५५ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगीतले.