.................
हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
अनसिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांकडून हयातीचे प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी केले.
..............
हरभरा पिकावर वानरांचा ताव
ताेंडगाव : परिसरात यंदा बहरात असलेल्या हरभरा पिकावर वानराचे कळप ताव मारत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा रबी पिकांची पेरणी झपाट्याने उरकली. वानरांचे कळप शिवारात धुडगूस घालून हरभऱ्याचे घाटे फस्त करताना दिसत आहेत.
................
खड्ड्यामुळे वाहनचालकांना त्रास
शेलूबाजार : मालेगाव-वाशिम आणि मालेगाव-मेहकर या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना चालकांची दमछाक होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
...............
पथदिवे दुरुस्तीची मागणी
पोहरादेवी : परिसरातील अनेक गावांत मुख्य चौकातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. पोहरादेवी येथेही काही दिवे बंद आहेत. ही बाब लक्षात घेऊन गावातील नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
..............
गांडूळ खत कार्यशाळेला प्रतिसाद
धनज : जानोरी येथे पाणी फाउंडेशनकडून नॅडेप व गांडूळ खतनिर्मितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
.................
घरकुल अनुदान रखडले !
उंबर्डा बाजार : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचे अनुदान रिठद परिसरातील ५० ते ६० लाभार्थ्यांना मिळाले नाही. लाभार्थ्यांनी लॉकडाऊनपूर्वी घरकुलाचे बांधकाम केले. त्यामुळे अनुदान मिळणे अपेक्षित आहे.
..............
गतिराेधक बसविण्याची मागणी
कामरगाव : कामरगाव-अमरावती मार्गाचे काम झाल्याने भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. यामुळे गावाजवळ गतिराेधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.