कारंजालाड : शहराच्या सौदर्यीकरणात भर पडावी या हेतूने जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या भगवान महावीर उद्यानाची दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होत चालली आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. कारंजा नगर परिषदेने १९८५ वर्षामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शशिकांत चवरे यांच्या कार्यकाळात श्री भगवान महावीर उद्यान विकसित केले. १९ एकरच्या राखीव असणार्या जागेमधील चार एकरामध्ये या उद्यानाची निर्मिती केली. उद्यानामध्ये विविध प्रकारची सुंदर व आकर्षक फुलझाडे, वृक्ष व लहान बालकासाठी घसरगुंडी, तसेच विविध प्रकारची रंगीबेरंगी कारंजी, खेळणी साहित्य व पाण्यासाठी सिमेंटचे विविध प्रकारचे गोलाकार टाके ,नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र याकडे नगर परीषद साफ दुर्लक्ष करीत असल्याने सदर उद्यान ओस पडत गेले. उद्यानाची तोडफोड करीत प्रवेश गेट काही नागरिकांनी तोडून टाकले.यामुळे उद्यानामधील असणारे साहित्य चोरीस गेले. त्यामधील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. त्यामुळे पर्यावरण नष्ट झाले. खेळण्यासाठी असणार्या साहित्याची तोडफोड केली,काही चोरुन नेले, संरक्षण भिंत तोडल्या . त्यामुळे उद्यानात घाणीचे समा्रज्य निर्माण झाले. परिसरातील नागरीकांकडून उद्यानातील झाडे तोडणे व ईतर साहित्याची तोडफोड करणे आजही राजरोसपणे सुरूच आहे.
कारंजाच्या महावीर उद्यानाची दुरवस्था
By admin | Updated: August 6, 2014 00:10 IST