शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा शहर हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:05 IST

केंद्रीय पथकाचा अहवाल : पालिकेच्यावतीने आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गठीत केंद्रीय पथकाने तपासणी करून कारंजा शहर हगणदरीमुक्त झाल्याचा अहवाल १८ जुलै रोजी शासनाकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे शासकीय निकषानुसार अमरावती विभागात उत्तीर्ण होणारी नगर परिषद म्हणून कारंजाला मान मिळाला असून, याप्रती नगर परिषदेच्यावतीने आज मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.१५ जुलै रोजी शासनाच्या केंद्रीय पथकाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कारंजा शहरातील मु.जे.हायस्कूल, आर.जे.हायस्कूल, रंगारीपुरा, भारतीपुरा, सारंग तलाव, शीतला माता परिसर, शिवाजी हायस्कूल पुतळा आदी परिसराची जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला. १८ जुलै रोजी शासनाच्या निकषानुसार कारंजा नगर परिषद सर्वांगाने उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद उत्तमराव वानखडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. केंद्रीय नियंत्रण कक्ष, दिल्ली येथून कारंजा नगर परिषद उत्तीर्ण झाल्याची घोषणा प्राप्त होताच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी फटाके व ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी वानखडे यांचा आरोग्य सभापती जावेदद्दोनी इस्मामोद्दीन व न.प.कर्मचाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम.टी.खान, आरोग्य सभापती इस्लामोद्दीन यांच्यासह सर्व सदस्यांनी स्वच्छ भारत अभियानास वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले. संदेश मोरे, स्वच्छ भारत अभियान कक्ष प्रमुख दरेकर, सी.आर.दंडवते, अभियंता बनसोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमेश सरगर, प्रफुल आग्रेकर, बाळकृष्ण देशमुख, सहा. कार्यालय पर्यवेक्षक वसंत पाटील, कर निरीक्षक राजू खंडारे, निशिकांत परळीकर, सहा. मिळकत व्यवस्थापक प्यारेचंद आदिवाल, गुलशन गेडाम, अग्निशमन अधिकारी माधवी भिलावेकर, संगणक अभियंता इलियास अहेमद, रोखपाल, प्रवीण मोहेकर, बांधकाम अभियंता विशाल सैवर, विद्युत अभियंता विशाल वाघ, विधी व कामगार पर्यवेक्षक धम्मपाल पंडित, साखरकर , मुकुंद लोखंडे व सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी पुढाकार घेतला.