शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शिरपूर येथे अनियमित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:31 IST

अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यापारी, बँक, विविध कार्यालयातील सेवा प्रभावित होत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज कार्यालयाला घेराव घालण्यात येईल ...

अनियमित वीजपुरवठ्यामुळे व्यापारी, बँक, विविध कार्यालयातील सेवा प्रभावित होत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीज कार्यालयाला घेराव घालण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीमध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वात चांगली सेवा देण्यासाठी शिरपूर वीज वितरण कार्यालयाचा नावलौकिक होता, मात्र गत एक, दीड महिन्यापासून दिवसभरात दहा ते पंधरावेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा मोठा परिणाम विविध व्यवसायासह, बँक, पोस्ट ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या सेवेवर सुद्धा होत आहे तसेच रात्री बेरात्री खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने शिरपूर येथील वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित स्वरुपाचा न करता सुरळीत व नियमित करावा. सोमवार १९ जुलैपर्यंत वीजपुरवठा सुरळीत व नियमित न झाल्यास मंगळवार २० जुलै रोजी शिरपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाला व अधिकाऱ्याला घेराव घालण्यात येईल, असे निवेदन १६ जुलै रोजी शिरपूर येथील सहायक अभियंता यांना दिले.

या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदीप देशमुख, किशोर देशमुख, अमोल शंकरराव देशमुख, अमोल भास्करराव देशमुख,बाळू प्रल्हादराव देशमुख, भीमराव देशमुख,रवि देशमुख, विठ्ठल देशमुख, रमजान रेघीवाले, कैलास भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आली आहे.