जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या तीन नामवंत संस्थांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यासाठी ११ जून २०२० रोजीच्या शासननिर्णयानुसार अर्ज, प्रस्ताव शासनास सादर करावयाचे आहेत. याकरिता ज्या संस्थांना आपले अर्ज, प्रस्ताव सादर करावयाचे आहेत, त्यांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीने केले.
०००
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
वाशिम : केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे आणि दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वाशिम येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २७ जानेवारी रोजी तहसिलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
००००
मतदार दिनानिमित्त शपथ कार्यक्रम
वाशिम : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.