शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळूंचे ढिगारे देतात अपघातास आमंत्रण

By admin | Updated: June 7, 2014 22:29 IST

बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून,

कारंजालाड : बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून, रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.अतिशय वर्दळीचे व गजबजलेले शहर म्हणून कारंजाचा उल्लेख होतो. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्याही वाढत असल्याने रहदारीसाठी शहरातील मुख्य रस्ते अरूंद पडू लागले आहेत. आधुनिकीकरणामुळे जुनी दुकाने पाडून त्याऐवजी नवी दुकाने व कॉम्प्लेक्स उभारणीची कामेही शहरात होत आहेत. या बांधकामासाठी वाळू आणि गिट्टीचा मोठय़ा प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. मात्र बांधकाम करीत असताना वाळू आणि गिट्टी सर्रासपणे रहदारीच्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.शहरातील नविन बसस्थानक ते डॉ.आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक ते इंदिरा गांधी चौक, जयस्तंभ चौक ते सिंधी कॅम्प, रामासावजी चौक ते पोहा वेश या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर नवीन घर, दुकान आणि कॉम्प्लेक्स उभारणीची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र रहदारीच्या रस्त्यावरच पडून असल्याचे दिसून येते. परिणामी रस्ता अरूंद होवून रहदारीला अडथळा येतो. तसेच वाळूंवरून मोटारसायकल घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहे. वाळूंच्या ढिगार्‍यामुळे आजवर शहरात अनेक अपघात घडले आहेत. कॉम्प्लेक्स आणि घर उभारणीचे काम पूर्ण होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. हे काम पूर्ण होईपर्यंत या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र बिनदिक्कतपणे रस्त्याच्या कडेला पडून राहते. दिवसभर या रस्त्यावरून वाहने जात असल्याने वाळू संपूर्ण रस्त्यावर पसरत असून त्यावरून मोटारसायकल घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. सूचनेनंतरही वाळू रस्त्यावर टाकली जात असल्याने नगर परिषदेला निर्देशाला ह्यठेंगाह्ण लावला जात आहे.

** वाळूंच्या ढिगार्‍यामुळे होतात ह्यराडेह्ण

घर बांधणीचे कामे शहरातील प्रत्येक प्रभाग अथवा ग्रामपंचायतच्या अखत्यारित सुरू आहेत. घराचे बांधकाम करताना वाळू रस्त्यावर साठविल्या जात असल्याने ह्यराडाह्ण होत आहे.वाळू आणि गिट्टीमुळे रहदारीला खोळंबा होत असल्याने वाद विकोपाला जात आहे. याशिवाय लहान मुले-मुली वाळूंवर खेळत असल्याने रेती दूरपर्यंत पसरत जाते. घर पुनर्रबांधणीचे काम करताना कंत्राटदार स्वत:च्या सोयीसाठी जाणीवपूर्वक बांधकामस्थळाजवळ वाळू व गिट्टी साठवून ठेवतो. परिणामी भांडणाला तोंड फुटते. वाळू आणि गिट्टीच्या सभोवताल विटांचा मोठा थर लावल्यास ते रस्त्यावर पसरणार नाही. परिणामी अपघातास आळा बसू शकतो.