शेगाव : पॅलेस्टाईनवर इस्त्राईल कडून वारंवार हल्ले होत आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. या हल्ल्याच्या शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. याबाबत आज २२ जुलैरोजी तहसिलदार डॉ. रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आले. तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पॅलेस्टाईनवर इस्त्राईलकडून वारंवार हल्ले होत आहे. या हल्ल्यात अनेक निष्पापांचा नाहक बळी जात आहे. याकरिता भारताने गाजा पट्टीवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. इस्त्राईल पॅलेस्टाईन देशात गैरकायदेशीर घुसून ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी आहे. तर काहीचा मृत्यूही झाला. पॅलेस्टाईन भारताचा जुना सोबती असून इस्त्राईलचे सैन्य कार्यवाहीचा निषेध करण्यात आला. तसेच पंतप्रधानांनी आपल्या मित्र देशासोबत चर्चा करुन पॅलेस्टाईनला योग्य ती मदत करावी, तसेच तेथे शांतीचा संदेश पोहचवून शांती व सुवस्था प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अन्सार अहेमद सिद्दीकी, मो.राजीक मेंबर, रफीक ठेकेदार, सादिक साहेब, मो.वसीम पटेल, फिरोज खान, मो.जुबेर सहारा, शे.हसन, शे.शकील, डॉ.असलम खान, सैय्यद इरफान, मो.इमरान फैसल, मजित खान, शे.अनिस, हसन कामील यांच्यासह सुलतान सेना, जमाते इस्लामी, इकबाल चौक ग्रुप, फलाहुन्नास ग्रुप, के .जी.एन. ग्रुप, डायमंड ग्रुप, येटीसीक्स ग्रुपच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
पॅलेस्टाईनवरील हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: July 23, 2014 00:05 IST