शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन यंत्रणेसंदर्भात रुग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर, नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक ...

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अविनाश आहेर, नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक प्र. कि. दांदळे, ‘आयएमए’चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह मुख्याधिकारी, अग्निशमन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या इमारतींमध्ये बिल्डिंग कोडनुसार अग्निशमन यंत्रणा, इमर्जन्सी एक्झिट यांसारख्या आवश्यक बाबी आहेत की नाही, या संदर्भात नगरपरिषदेने कालबद्ध मोहीम राबवून तपासणी करावी. आरोग्य विभागानेसुद्धा जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी करून बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टअंतर्गत नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांसह उपलब्ध आवश्यक सुविधांची तपासणी करावी. नगरपरिषद व आरोग्य विभागाने यापुढे प्रत्येक वर्षी सहा-सहा महिन्याने अशा प्रकारे रुग्णालयांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच कर्मचाऱ्यांना याविषयी आवश्यक प्रशिक्षण द्यावे. वर्षातून किमान एकदा सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये येथे अग्निशमन यंत्रणेच्या वापराबाबत ‘मॉक ड्रिल’ घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.