शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांवर नियंत्रणासाठी शेतकर्‍यांचा अभिनव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:28 IST

वाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्‍या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. 

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील प्रकार पंख्याचे पाते वापरून बनविले आवाज करणारे यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करणार्‍या वन्य प्राण्यांसह पक्ष्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी अभिनव प्रयोग केला आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते आणि स्टिलचे ताट वापरून त्यांनी हवेवर चालणारे आणि मोठा आवाज करणारे यंत्रच तयार केले. यामुळे वन्य प्राणी शेताच्या आसपासही फिरकत नसल्याने त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे.  रोही, रानडुक्कर, हरीण, माकडे आदी वन्य प्राणी शेतशिवारात धुमाकूळ घालून पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या वन्य प्राण्यांना मारताही येत नाही. त्यातच रानडुकरांसारखे प्राणी, तर शेतकर्‍यांवरच हल्ले करतात. त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न अनेक शेतकर्‍यांना सतावत आहे. यावर एक नामी उपाय मंगरुळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांनी शोधला आहे. शेतकर्‍यांनी त्यासाठी एक आवाज काढणारे आणि हवेच्या आधारे फिरणारे यंत्रच तयार केले आहे. प्लास्टिकपासून बनलेले कुलरचे पाते सायकलमधील रिंगच्या बेअरिंगला फिट करून त्या बेअरिंगच्या दुसर्‍या बाजूने एक लोखंडी पट्टी फिट केली. त्या पट्टीच्या दोन्ही टोकांवर साखळीचे सहज वेडेवाकडे होणारे तुकडे लावले, हे वार्‍याने फिरणारे यंत्र एका लाकडी खांबावर बसवून. त्याच खांबावर पंख्याच्या मागील बाजूस लोखंडी पट्टीवर बसविले व साखळीचे तुकडे सहज आदळतील अशा अंदाजाने स्टिलच्या धातूचे ताटही बसविले. वारा जोरात वाहू लागला की कुलरचे पाते फिरायला लागते आणि त्यासोबत मागील बाजूस बसविलेली लोखंडी पट्टी फिरून त्या पट्टीच्या दोन्ही टोकावर लावलेल्या साखळय़ा ताटावर आदळत राहतात. त्यामुळे सतत आवाज होत राहतो. हा आवाज होत असल्याने शेतात कोणी असल्याचा भास प्राणी आणि पक्ष्यांना होतो. परिणामी ते शेताच्या आसपासही फिरकत नाहीत. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथील शेतकरी शशिकांत गहुले आणि मानोली येथील शेतकरी मनोहर महाकाळ यांच्यासह शिवारातील अनेक शेतकर्‍यांनी या यंत्राचा वापर सुरू केला आहे.