शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहांमध्ये असुविधांचा भडिमार!

By admin | Updated: June 23, 2016 01:05 IST

लाखो रुपयांचे अनुदान होतेय ‘गडप’;‘लोकमत स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाल्या गंभीर उणिवा

वाशिम: आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, त्यांच्या निवासाची, भोजनाची सोय व्हावी, यासाठी लाखो रुपये खचरून शासकीय वसतिगृहे चालविली जातात; मात्र शासनाकडून मिळणारा पैसा मधातच गडप होत असल्याने वसतिगृहांमध्ये असुविधांचा अक्षरश: भडिमार झाल्याचे वास्तव लोकमतने मंगळवार, २१ जून रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड झाले.लोकमतने मंगळवारी वाशिम शहरातील सामाजिक न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांना भेटी देऊन तेथील सद्यस्थितीबाब जाणून घेतले असता, यावेळी वसतिगृहांमधील सुविधांबाबत अनेक गंभीर उणिवा आढळून आल्या. वाशिम-पुसद रोडवर अनंत व्यंकटराव मुसळे यांच्या मालकीच्या इमारतीत फेब्रुवारी २00९ पासून भाडेतत्त्वावर सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे वसतिगृह सुरू आहे. त्यापोटी सामाजिक न्याय विभाग मुसळे यांना दरमहा २७ हजार ३५0 रुपये भाडे अदा करते. ७६ प्रवेश क्षमता असलेल्या या वसतिगृहाच्या इमारतीत पाच छोट्या स्वरूपातील खोल्या आणि एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान या खोल्यांची पाहणी केली असता, कडी-कोंड्याविना असलेले दरवाजे, ठिकठिकाणी साचलेला कचरा, पसरलेली दुर्गंधी, तुटलेले पलंग, मळालेल्या गाद्या, भिंतींची झालेली दुरवस्था, आदी गंभीर प्रकार आढळून आले. विशेष गंभीर बाब म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये ३ याप्रमाणे ५ खोल्यांमध्ये १५ विद्यार्थी वगळता एका छोट्याशा हॉलमध्ये उर्वरित तब्बल ६१ विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. या इमारतीत ७६ विद्यार्थ्यांसाठी उणेपुरे ३ ते ४ शौचालय आणि तेवढेच स्नानगृह आढळून आले. वसतिगृहात वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबतीत गैरसोय ठरू पाहणारी ही इमारत बदलण्याचा पुसटसा विचारही सामाजिक न्याय विभागाने गेल्या ७ वर्षांमध्ये केला नाही. यामागील कारणांचा अभ्यास केला असता, ज्यांच्या मालकीची ही इमारत आहे, ते स्वत: सामाजिक न्याय विभागात बड्या हुद्यावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली.