राज्य सरकारचे स्वप्न या दालनातून साकार होत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून आर्थिक सुलभता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे मत यावेळी पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी संत अमरदास पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमचंद बगडिया यांच्यासह खासदार भावनाताई गवळी, आमदार अमित झनक, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., उपजिल्हाधिकारी वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार अजित शेलार, जि.प. सभापती चक्रधर गोटे, जि.प. गटनेता स्वप्निल सरनाईक, बीज प्रमाणीकरण अधिकारी पी.व्ही. उन्हाळे यांची उपस्थिती होती. संचालक पंजाबराव अवचार यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा प्रतिमा देऊन गौरव केला. या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध उत्पादक संघाचे सहकार्य मिळाले. (वा.प्र.)
‘अपनी मंडी अपना बाजार’चे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST