शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने ...

वाशिम : ‘आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यासोबतच उंटांची तस्करी करणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घ्या, असे निर्देश दिले.

राजस्थान येथून उंटांची तस्करी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. उंट चोरी करून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जातात. मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून सहा उंटांचा कळप घेऊन महू येथील योगेश हुकमचंद प्रजापती व मुखेड, जिल्हा नांदेड येथील भीमराव बुद्धू राठोड हे दोघेजण रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास अमरावती - हैद्राबाद महामार्गावरून कारंजा ते मंगरूळपीरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती जाणून घेतली. यावेळी संबंधित दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

दरम्यान, मध्यप्रदेशातील महू येथून परतवाडा जंगलमार्गे कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग, खंडाळा व यवतमाळच्या सीमा भागातून छुप्या व आडमार्गाने पायी प्रवास करत थेट हैद्राबाद येथील कत्तलखान्यात उंटांची रवानगी करण्यात येते व कत्तलीनंतर मांस व कातड्याचीही विक्री केली जाते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करताना सर्व संबंधित ठाणेदारांना कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.

.................

बॉक्स :

दोन वर्षांपूर्वी झाली होती कारवाई

दोन वर्षांपूर्वी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातूर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटांचा कळप अडवून पातूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावरून संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही १७ डिसेंबर २०१९ रोजी सुमारे २५ ते ३० च्या संख्येत उंटांचा कळप वाशिम शहरातून रात्रीच्या वेळी हिंगोलीच्या दिशेने रवाना होऊन तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी गेल्याची माहिती आहे आणि आता १४ मार्च रोजी दोघेजण सहा उंटांसह मार्गक्रमण करताना आढळून आले आहेत.

...............

बॉक्स :

आंध्रात गेलेले उंट परतलेच नाहीत

राजस्थान येथून दरवर्षी शेकडोंच्या संख्येत उंटांचे कळप महाराष्ट्रातील विदर्भातून आंध्रप्रदेशात नेले जातात. मात्र, मागील ५० वर्षांपासून दक्षिणेकडे गेलेले लाखोंच्या संख्येतील उंट परतीचा प्रवास करून राजस्थानात जाताना कधीच आढळले नाहीत. त्यामुळे उंटांची तस्करी करून कत्तल केली जात असल्याचे स्पष्ट होते. आता उंट चोरट्यांनी आपला मार्ग बदलून अकोला जिल्ह्यातील पातूरमार्गे न येता परतवाडा, अमरावती, कारंजा, मंगरूळपीर, अनसिंग या रस्त्याने जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.