शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड नसेल तर शिष्यवृत्तीही नाही!

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा फतवा : ‘ऑनलाइन’द्वारे मिळणार लाभ.

वाशिम, दि. २८: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच्या शिष्यवृत्तीचा लाभ ऑनलाइन प्रणालीद्वारे मिळणार असून, आधारकार्ड सादर केले नाही तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही, असा इशारा अकोला-वाशिम एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने दिला आहे.भारत सरकार इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाने सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल तयार केले आहे. सन २0१६-१७ या वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड क्रमांकाची नोंद हीे ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जामध्ये करणे बंधनकारक केले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार अकोला व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित सर्व शाळा, महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड ३0 ऑगस्ट २0१६ पर्यंत काढण्याच्या दृष्टीने सर्व शाळा व महाविद्यालयांनी कार्यवाही तत्काळ करावी, असा फतवा एकात्मिक आदिवासी प्रकल्प जिल्हा कार्यालयाने काढला आहे. ऑनलाइन अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांकाची नोंद न केल्यास किंवा आधारकार्ड नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याप्रकरणी संबंधित शाळा, महाविद्यालयांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दिला.