शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

लालफितशाहीत अडकले गृहरक्षक दल

By admin | Updated: July 29, 2014 21:00 IST

जिल्हा समादेशकाचे पद रिक्त, मुख्यालयाच्या इमारतीला अद्याप जागा नाही, कार्यालयीन कर्मचार्‍यांचीही अनेक पदे रिक्तच

वाशिम: सार्वजनिक उत्सव असो, निवडणूका असो अथवा मानव निर्मित आपत्ती प्रत्येक वेळी पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची धुरा सांभाळणारे जिल्ह्यातील गृहरक्षक दल आजमितीला लालफितशाहीत अडकले आहेत. सन २0१0 मध्ये निर्माण झालेल्या येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला इमारत मिळू शकली नाही. कार्यालयीन कर्मचार्‍यांची पदे, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य आदी बाबींचा येथे दुष्काळ पडला आहे. सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचें विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा निर्माण झाला. त्यामुळे स्वाभाविकच जिल्हास्तरावर आवश्यक असणारी कार्यालये येथे थाटण्यात आली. गृहरक्षक दलाचे मुख्यालय मात्र याला अपवाद ठरले. सन २0१0 पर्यंत जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचा कारभार अकोल्यातून चालायचा. सन २0१0 ला येथे कार्यालय सुरू करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे येथील जिल्हा समादेशाचा पदभार सोपविण्यात आला होता. गृहरक्षक दलाच्या येथील कार्यालयाला तब्बल चार वर्षापासून कायमस्वरूपी समादेशक मिळाले नाहीत. सद्यस्थितीत प्रभारी पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. वाशिमच्या होमगार्डाची जबाबदारी आहे. वाशिम जिल्हयात सद्यस्थितीत ३८५ गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्य बजावत असून यामध्ये २0४ पुरुष तर १८१ महिलांचा समावेश आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या एका खोलीत सद्या गृहरक्षक दलाचे कार्यालय सुरू आहे. गृहरक्षक दलाला ईमारत तथा प्रशिक्षणासाठी जागा नसल्यामुळे कर्तव्य बजावणार्‍या गृहरक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहे. जागे अभावी मागील अनेक वर्षापासून प्रशिक्षण शिबिर झाले नाही त्यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. गृहरक्षक दलाच्या मुख्यालयाची इमारत उभी रहावी यासाठी वाशिम शहरात अनेक जागा व इमारती आहेत. जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेऊन मुख्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्याचा गृहरक्षक दलाच्या जवानांना लाभच होणार आहे.