कोंडाळा महाली : येथे मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. परंतु संबंधितांनी गारपीटग्रस्तांची सदोष यादी बनवून सदोष अहवाल सादर केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी वंचित राहिल्याचा आरोप २३ जुन रोजी वाशिम तहसिलदार आशिष बिजवल यांना दिलेल्या निवेदनामध्ये वंचित गारपीटग्रस्त शेतकर्यांनी केला आहे.गारपीटग्रस्तांच्या यादीमध्ये जे खरोखरच नुकसानग्रस्त लाभार्थी आहेत त्यांची नावे वगळून ज्या कास्तकारांच्या शेतामध्ये गहू, हरभरा नसताना सुद्धा त्यांचे नाव सदर यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे मुलत: ज्या कास्तकारांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना गारपीटग्रस्त म्हणून मिळणार्या मोबदल्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. तांदळी शेवई येथेदेखील अनेक पात्र शेतकर्यांना भरपाईपासून डावलण्यात आले आहे. शेतकर्यांनी यापूर्वी तहसील प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.याबाबत चौकशी करुन संबंधित दोषींवर कार्यवाही करण्यात यावी आणि वंचित गारपीटग्रस्तांना त्याचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य राहुल तुपसांडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाउ भिसे आणि ३४ गारपीटग्रस्त शेतकर्यांनी सहीनिशी तहसिलदार वाशिम यांच्याकडे केली आहे. याबाबत तहसिलदार आशिष बिजवल यांना विचारणा केली असता मंडळ अधिकारी यांना विचारुन चौकशी केली जाईल असे सांगितले.
गारपीटग्रस्तांना डावलले
By admin | Updated: June 28, 2014 01:41 IST