शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बंदीतही गुटख्याची चांदी

By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST

वाशिम शहरात गुटखाबंदीचा बोजवारा : खुलेआम विकल्या जातोय गुटखा.

वाशिम : राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाने लागु केलेल्या गुटखाबंदीच्या पदराआड शहरात लाखोंच्या गुटख्याचा काळाबाजार फोफावला आहे. काही वितरकांनी गुटख्यासह पान मसाल्याची मोठय़ा प्रमाणात साठेबाजी केलेली असुन आजमितीला चढय़ाभावात त्याची विक्री सुरू आहे. लोकमतने १८ जुलैला राबविलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाने सद्यस्थितीत वाशिमसह अकोला जिल्ह्यातील २४00 व्यापार्‍यांना व्यवसायाचे परवाने दिले आहेत. तर ३000 लघु व्यावसायिंकाची नोंदणी या विभागाकडे आहे. यापैकी बहुतांश व्यापार्‍यांचा गुटखा व पान मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. गुटख्यावर बंदी येण्यापूर्वी प्रत्येक दुकानदाराकडुन दिवसाकाठी गुटख्याचे पाच ते सहा पुडे विकले जात होते. गुट ख्याच्या एका पुड्यात साधारणपणे ५५ पाकीटे येतात. त्यामुळे गुटख्याच्या या विक्रीतून दिवसाकाठी लाखोंची उलाढाल होते. यामध्ये सुमारे २0 टक्के विक्रे त्यांला नफा मिळतो. शासनाने सन २0१२ मध्ये गुटखा व पानमसाला विक्रीवरच बंदी आणली आहे. परिणामी, या व्यवसायातील लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. नेमका याच बंदीचा फायदा घेऊन शहरातून काही विक्रेत्यांनी परप्रांतातून गुटखा व पान मसाला आणून त्याची साठेबाजी केली आहे. विशेष म्हणजे गुटखा पुडीच्या तिप्पट किमतीने आजमितीला विक्री सुरू आहे. लोकमतने १८ जुलैला राबविलेल्या स्टिंग ऑपरेशमधून ही बाब समोर आली आहे.लोकमतने लाखाळा परिसर, हिंगोली नाका, अकोला नाका, पुसद नाका व हिंगोली नाका चौकात स्टिंग केले. यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायकच आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग अथवा पोलीस विभाग यापैकी कुणाचीच गुटखा विकणार्‍यांना भिती उरली नसल्याचे दिसून येत आहे. यातूनच दिवसागणिक हा काळाबाजार फोफावतच चालला आहे.