शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

कारमेलच्या मुख्याध्यापकाविरोधात पालक संतप्त

By admin | Updated: September 5, 2015 01:38 IST

अमरावतीच्या पथकाने केली चौकशी; गुरूवारपर्यंंत निर्णयाची दिली ग्वाही.

वाशिम : येथील माऊंट कारमेल शाळेतील मुख्याध्यापकाच्या उद्धट व अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात ४ सप्टेंबर रोजी संतप्त झालेले शेकडो पालक एकत्र येऊन मुख्याध्यापकाच्या बदलीची मागणी अमरावतीच्या त्रिसदस्य शिष्टमंडळाकडे केली. शिष्टमंडळासोबत तब्बल दोन ते तीन तास ह्यमॅरेथॉनह्ण चर्चा पार पडली. इ.स. १९९८ साली या शाळेची मुहूर्तमेढ वाशिम शहरामध्ये रोवल्या गेली. माऊंट कारमेल शाळा जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित शाळा म्हणून समोर आली आहे. या शाळेमधील शिस्त व शिक्षण याचा दर्जा चांगला असल्यामुळे शहर व परिसरातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी, अधिकारी यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्तींची मुले शिक्षण घेतात. गेल्या १६ वर्षांच्या कार्यकाळामध्ये फादर मॅथ्यु असो किंवा इतर फादर असो, या सर्वांंंनी प्रामाणिकपणे सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना आपल्या परिवारातील सदस्य समजून सर्वांंंसोबत प्रेमाची व आदराची वागणूक दिली. आजपर्यंतच्या सर्वच फादर यांनी आपल्या शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावर नेऊन ठेवण्यात मोलाचे योगदान दिले, हे सर्वश्रुत आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी फादर मॅथ्यु यांची बदली झाली. त्यांचे जागेवर फादर संजय वानखडे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. आपला पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच वानखडे यांचा कारभार वादग्रस्त ठरला. वादग्रस्त ठरलेले वानखडे यांनी शिक्षकांवर केलेल्या अत्याचाराची माहिती प्रसिद्धीमाध्यमामार्फत पालकांना मिळाली. केवळ या माहितीच्या आधारावर शेकडो पालकांनी सकाळी ९ वाजेपासून माऊंट कारमेल शाळेकडे धाव घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुणाचेही नेतृत्व नसताना एवढय़ा मोठय़ा संख्येत पालक एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्याध्यापक वानखडे व इतर शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांच्यावर गेल्या दोन महिन्यात झालेल्या अत्याचाराला हळूहळू वाचा फुटायला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक-दोन नव्हे तर शेकडो पालकांनी आपले मन मोकळे करून वानखडे यांनी कशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली. याचा इत्यंभुत पाढाच अमरावती येथून आलेल्या शिष्टमंडळासमोर कथन केला. तथापि, संतप्त पालकांनी शैक्षणिक वातावरणात बाधा आणणार्‍या मुख्याध्यापक संजय वानखडे, शिक्षक सोजी जॉय, जयंत बर्डेकर व एका सुरक्षारक्षकावर कार्यवाही करून त्यांची बदली करा, अशी मागणी केली.