शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या राजपत्राने कारंजा उपविभागावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: August 23, 2014 22:38 IST

वाशिम जिल्ह्यातील महसुल उपविभाग निर्मीतीचा प्रश्न राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी काढलेल्या राजपत्रामुळे निकाली निघाला आहे.

वाशिम : आक्षेपांमूळे याआधी रखडल्या गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील महसुल उपविभाग निर्मीतीचा प्रश्न राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी काढलेल्या राजपत्रामुळे निकाली निघाला आहे. या राजपत्रामुळे जिल्ह्यातील वाशिम उपविभाग जैसे थे ठेवत कारंजा नविन उपविभाग निर्माण झाला असून एकाच तालुक्याचा मंगरुळपीर उपविभागही या राजपत्रानुसार अस्तित्वात आला आहे. जून २0१२ मध्ये राज्य शासनाने नव्याने ७१ महसुल उपविभाग निर्मीतीसाठी अधिसुचना काढली होती. २८ जून २0१२ रोजी क्र.प्रा.से.ब.२0१0/प्र.क्र.२६/पुनर्बांंधणी-३ म.-१0 नुसार राज्यातील त्यावेळी अस्तित्वात असलेल्या ११२ महसुल उपविभागात ७१ उपविभागाची वाढ होउन १८३ उपविभाग राज्यात अस्तित्वात येणे अपेक्षीत होते. परंतू त्यावेळी वाशिम जिल्हा वगळता राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये उपविभाग निर्मीतीची प्रक्रीया झाली होती. त्यामुळे राज्यात १८३ ऐवजी १८२ उपविभाग अस्तित्वात आले होते. दोन वर्षानंतर राज्य शासनाने पून्हा एकदा वाशिम जिल्ह्यात महसुल उपविभाच्या निर्मीती प्रक्रीयेला गती देत १४ ऑगस्ट २0१४ रोजी अधिसुचना जाहीर केली. या अधिसुचनेनुसार उपविभाग निर्मीतीचे नवे स्वरुप जनतेसमोर ठेवले होते. त्यानुसार जिल्ह्यात कारंजा व मानोरा तालुका मिळून नवा उपविभाग निर्माण करण्याचे शासनाने स्पष्ट केले होते. मंगरुळपीर उपविभाग कायम ठेवत अस्तित्वातील वाशिम, रिसोड, मालेगाव मिळून असलेल्या वाशिम उपविभागालाही धक्का न लावण्याचे शासनाने अधिसुचनेत सांगितले होते. यासंबंधी आक्षेप वा हरकतीसाठी २१ ऑगस्ट २0१४ ही अंतिम मुदत ठेवली होती. निर्धारीत २१ ऑगस्टच्या कालावधीत लोकप्रतिनिधी किंवा जनतेतून आक्षेप वा हरकती न आल्याने राज्य शासनाने यासंदर्भात २२ ऑगस्ट २0१४ रोजी राजपत्र जाहीर केले. यामध्ये विहित मुदतीत कोणती हरकत न आल्याने शासनाने आजमितीला अस्तीत्वात असलेल्या राज्यातील १८२ उपविभागात आणखी एका उपविभागाची भर घालत कारंजा-मानोरा उपविभागाच्या निर्मीतीवर शिक्कामोर्तब केले आहे. येत्या २५ ऑगस्टपासून कारंजा- मानोरा उपविभाग कार्यान्वीत करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरु झाल्या आहेत.