वाशिम : शेतकर्यांच्या मालाला भाव न देणे, त्याच्या अडचणी अग्रक्रमाने न सोडविणे, शासनाच्या योजनांचा योग्य लाभ न देणे व विविध योजनांमधील क्लिष्ट अटींमुळे शेतकरी खचला आहे. कोणत्याही योजनेचा लाभ शेतकर्याला घ्यायचा असल्यास किंवा नुकसान झाल्यास मिळणार्या मदतसाठी मदतीपेक्षा जास्त खर्च येतो याकडे शासनाचे लक्ष नसल्यानेच शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचला असल्याचा २४ सप्टेंबर रोजी आयोजित सूर अन्नदाता प्रबोधन मंथनामध्ये दिसून आला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच उद्भवणार्या प्रतिकुल परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला आहे. नैराश्येने ग्रासलेल्या अशाच काही शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा कटू निर्णय घेतला; मात्र किमान यापुढे तरी शेतकरी आत्महत्यांच्या घटनांना पायबंद लागून जगाच्या पोशिंद्याला सन्मानाने जगता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतिने ह्यअन्नदाता प्रबोधन मंथनह्ण सभेचे आयोजन २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याला रोख देण्यासाठी काय करायला पाहिजे यावरील काही मुददे प्रशासनाच्यावतीने काढून ते सभेत सांगण्यात आले. तसेच यावर शेतकरी, मान्यवरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बहुतांश शेतकर्यांनी व उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या धोरणावर ठपका ठेवला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे, तहसीलदार आशिष बिजवल, आत्माचे प्रकल्प संचालक वाघमारे यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची रुपरेषा मान्यवरांनी व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमास उपस्थित शेतकर्यांनी व मान्यवरांनी आपल्या मते व्यक्त केलीत. यावेळी हरिभाऊ क्षीरसागर यांनी शासनाच्यावतिने कृती कार्यक्रम योग्य राबविल्या जात नाही. त्याकडे लक्ष दयावे, अशी मागणी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शेतकर्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष नसल्याचा आरोप केला. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करुन दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. अवि मारशेटवार यांनी शासनाच्या धोरणावर ताशोरे ओढत जिल्हाधिकारी यांनी आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे शेतकर्यांविषयीची तळमळ असल्याचेही सांगितले. शेतकर्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात यावी व ते २४ तास उघडे ठेवण्यात यावे, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणताही शेतकरी असो त्याचे फाटके कपडे न पाहता त्याला प्रथम प्रवेश देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी नारायण विभुते यांनी शेतकर्यांच्या शेतमालावर अडतीत २ टक्के घेतात, असा आरोप केला. त्यावेळी सारडा नामक व्यापार्याने यानंतर मी शेतकर्यांकडून एक टक्काच अडत घेणार असल्याचे आश्वासन दिले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. एम. बी. इंगळे यांनी केले. कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी अभियानाचा उद्देश विषद केला. आभारप्रदर्शन तहसीलदार आशिष बिजवल यांनी केले.
शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना शासनच कारणीभूत
By admin | Updated: September 25, 2015 01:24 IST