शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ...

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी गत तीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन, स्वच्छ भारत मिशनच्यावतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. लोककलावंत, कलापथकाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही घेण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजारावर शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हगणदारीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावात परिस्थिती जैसे थे झाली आहे. शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हगणदारीमुक्त झालेल्या अनेक गावात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हा स्वच्छता मिशनच्या कक्षाला दिले. शौचालयाच्या १०० टक्के वापरासाठी जिल्हयाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही जि. प. अध्यक्षांनी दिल्या. गुड मॉर्निंग पथकावर अधिक भर देण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा यामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले.