शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ओलांडले!

By admin | Updated: August 3, 2015 01:07 IST

रिसोड तालुक्यात वर्षभरात नऊ हजार शौचालय बांधकामाचे ‘टार्गेट’.

निनाद देशमुख / रिसोड: उघड्यावरील शौचवारीला आळा बसविण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम मोहिम शासनाने हाती घेतली आहे. २0१४-१५ या वर्षात रिसोड पंचायत समितीने उद्दिष्टापेक्षा जास्त बांधकाम करून जिल्ह्यात अवल्ल स्थान मिळविले आहे. २0५५ चे उद्दिष्ट पार करून तालुक्यात तब्बल २७३१ शौचालय बांधकाम झाले आहे. असे असले तरी आजही तालु क्यात केवळ ४0 टक्के कुंटुंबाकडेच शौचालय आहे. गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनातर्फे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलेले आहे. मध्यंतरी या अभियानाचे नाव बदलून निर्मल भारत अभियान असे ठेवले होते. गतवर्षी निर्मल भारत अभियान हे नाव बदलून आता ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण असे नामकरण केले होते. या अभियानांतर्गत प्रत्येक पंचायत समितीला वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात येते. २0१४-१५ या वर्षात रिसोड पंचायत समितीला २0५५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात पंचायत समितीने २७३१ शौचालय बांधकाम करून आघाडी घेतली आहे. स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी गावपा तळीवर जनजागृती केली. उद्दिष्ट पार केल्यानंतरही अनेकांनी शौचालय बांधकाम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अनुदानाचा प्रश्न समोर आल्याने अनेकांना शौचालय बांधकाम करता आले नाही. २0१५-१६ या वर्षासाठी रिसोड पंचायत समितीला ९१0४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी जून अखेरीस १३0६ शौचालयाचे बांधकाम झाले आहे. गत एका महिन्यापासून पाऊस नसल्याने शौचालय बांधकाम मोहिमेलादेखील फटका बसत आहे. कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती आणि जलपातळी खालावल्याने बांधकाम करण्यास कुणी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. येत्या चार वर्षात २२ हजार शौचालय बांधकामाचे 'टार्गेट' रिसोड पंचायत समितीला गाठावयाचे आहे.