शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरसाठी डिझेल भरण्यास परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

शिरपूर जैन : शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पेट्रोलपंपधारकांनी बंद केल्याने शेती मशागतीचे काम ...

शिरपूर जैन : शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पेट्रोलपंपधारकांनी बंद केल्याने शेती मशागतीचे काम रखडली आहेत. त्यामुळे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरकरिता लागणारे डिझेल भरण्याला परवानगी मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१० मेपर्यंत शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल देण्याची मुभा पेट्रोलपंपधारकांना होती. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी हे ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतीची मशागतही जोमाने करू लागले. मात्र जिल्हा प्रशासनाने ११ मेपासून ट्रॅक्टरमध्ये डिझेल देणे बंद केले. याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामावर झाला. ११ मे रोजी सकाळी पेट्रोलपंपावर डिझेल घेण्यासाठी आलेले ट्रॅक्टर शेतकऱ्यांना तसेच माघारी फिरवावे लागले. त्यामुळे शेती मशागतीच्या कामात खोडा निर्माण झाला आहे. डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी याविषयी संताप व्यक्त केला.

..

पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. खरीप हंगामासाठी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र ट्रॅक्टरमध्ये डिझेल देणे बंद केल्याने शेतीची कामे रखडली आहेत. शेतीप्रधान देशात शेतीच्या कामालाच डिझेल न देणे यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते.

भगवान शिंदे

शेतकरी, पांगरखेडा