शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली

By admin | Updated: August 15, 2014 02:08 IST

सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, योजनांची माहिती पुस्तीका बनवा, अशा विविध ठरावांसह अनेक विकासात्मक बाबींवर चर्चा

वाशिम : नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवावा, असा महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला होता. तोच ठराव आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही गाजला. सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, योजनांची माहिती पुस्तीका बनवा, जिल्हा परिषदेचे उत्पादन वाढवा, रस्ते व पुलांची कामे पूर्ण करा, अशा विविध ठरावांसह अनेक विकासात्मक बाबींवर सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. सायंकाळी ८ वाजेपर्यंत सभा सुरूच होती. शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांच्या बदल्या, पशुसंवर्धन विभागामार्फत दिल्या जाणार्‍या योजना, शाळा- अंगणवाडी व आरोग्य केंद्राच्या इमारतींसह इतर शासकीय इमारतींची, दुरुस्ती, आरोग्य विभागामार्फत दिले जाणारे दुर्धर आजारासाठीचे अनुदान, पाणीटंचाई यासह विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. च्या अध्यक्ष सोनाली जोगदंड होत्या. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई गणेशपुरे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक वानखेडे यांची मंचावर उपस्थिती होती.१४ ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी महिला ग्रामसभा झाल्या नसतील अशा ग्राम पंचायतींना कारणे दाखवा नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ठराव मांडणार्‍या सदस्यांचे समाधान सात दिवसात व्हावे, अशी अपेक्षा उस्मान गारवे यांनी व्यक्त केली.आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त विकास कामे करुन अखर्चीत निधी खर्च करण्याच्या व जि. प. च्या योजना लोकांपयर्ंत पोचवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी विभाग प्रमुखांना दिल्या. एकंदरीत या सभेत विविध विकासकामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत जि. प. सदस्य विकास गवळी, सचिन रोकडे, उस्मान गारवे, विश्‍वनाथ सानप, रत्नप्रभा घुगे, शिवदास पाटील, गजानन अमदाबादकर, चंदुभाऊ जाधव, श्यामराव बढे, रणजित जाधव, घुगे आदींनी प्रश्नांचा भडीमार केला; तसेच पंचायत समिती सभापती भास्कर पाटील, वीरेंद्र देशमुख, धनश्री राठोड यांनीही विविध विकास कामांबाबत चर्चा केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे आणि संबंधित विभाग प्रमुखांनी सभागृहाच्या प्रश्नांना सर्मपक उत्तरे दिली. वित्त व लेखा अधिकारी हिवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अभियंता निलेश राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी मेहकरकर, लघुलेखक नागेश थोरात, उमेश बोरकर, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, उपअभियंता एस. एम. मारके, शिरभाते, विनोद गिरी, मुकुंद नायक व जिल्हा परिषद जनसंपर्क अधिकारी राम ङ्म्रृंगारे व सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी सभेचे संचालन केले.